Join us  

...मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हसुद्धा ‘इंग्रजी’तच करावे; मनसेचा मार्मिक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 1:07 PM

महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येत असलेले आदेश इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्यात येत आहे. यावर मनसेकडून आक्षेप घेण्यात आला आहे

ठळक मुद्देराज्यातील सामान्य लोकांना मराठी भाषा कळते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही का? २ टक्के इंग्रजी समजणाऱ्या लोकांसाठी शिवसेना सरकार काम करत आहे का? ‘पुनश्च हरी ओम’ म्हटलं की १२ पानी आदेशाचा मराठी अनुवाद झाला, असं समजायचं का?

मुंबई – सध्या देशभरासह महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच ३१ मे रोजी देशव्यापी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपलेला आहे. आता अनलॉक १ देशात सुरु होणार आहे. मात्र केंद्राने याबाबत राज्य सरकारला आपापल्या पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. राज्यात लॉकडाऊन सुरु राहणार तर ते कशाप्रकारे असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला असते.

अशातच महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येत असलेले आदेश इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्यात येत आहे. यावर मनसेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी याबाबत ट्विट करुन इंग्रजीला महाराष्ट्राची राजभाषा केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन, शासनाच्या Mission Begain Again या आदेशाच्या शीर्षकाला ‘पुनश्च हरी ओम’ म्हटलं की १२ पानी आदेशाचा मराठी अनुवाद झाला, असं समजायचं का? मग मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह इंग्रजीतच करावं असा टोमणा त्यांनी हाणला आहे.

तसेच राज्यात लॉकडाऊनचं स्वरुप काय असणार हे जाणून घेण्यासाठी राज्यातील लोक आदेशावर तुटून पडले आहेत. पण आदेश संपूर्णपणे इंग्रजीतच आहे. राज्यातील सामान्य लोकांना मराठी भाषा कळते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही का? लॉकडाऊनबाबत लोकांच्या मनात गोंधळाची स्थिती आहे. आदेश मराठीत असता तर लोकांना व्यवस्थित समजला असता. त्यामुळे ९८ टक्के मराठी समजणाऱ्या लोकांना डावलून २ टक्के इंग्रजी समजणाऱ्या लोकांसाठी शिवसेना सरकार काम करत आहे का? असा सवाल किर्तीकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. त्यावेळी, लोकमान्य टिळकांचा दाखला देत पुनश्च हरी ओम.. म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात करत असून आता, प्रत्येक पाऊल जपून टाकायचं असल्याचे ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज्य सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी तीन टप्प्यांत नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे, लॉकडाऊनऐवजी आता मिशन बिगेन अगेन सुरु झालं आहे. एकीकडे लॉकडाऊन केलं असताना दुसरीकडे पूर्वपदावर येण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या कालावधीत संपूर्ण राज्यात काही स्थळं व व्यवसायास बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुनश्च हरी ओम... केल्यानंतरही काळजी घेणं अनिवार्य असून तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे बंधनकारक आहे. सध्या, पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने जास्त खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

…म्हणून चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज; ट्रम्प यांची काय आहे ‘जी ७’ रणनीती?

निर्दयी! ९ महिन्याच्या चिमुकल्याचा कोरोनामुळे मृत्यू; मृतदेह सोडून पळाले आई-वडील

१ ते ७ जून दरम्यान लोकांनी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; केंद्र आणि राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वं

जगप्रसिद्ध व्हिडीओ साइट Youtube ने त्यांचा लोगो काळा केला, जाणून घ्या काय आहे कारण?

७ दिवस अन् १ रस्ता, भारताचं सोनं लुटण्याची चीनने केली तयारी; लडाखमध्ये दडलाय मोठा खजिना!

टॅग्स :मनसेकोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरेमराठी