आनंदराज आंबेडकरांच्या अंगरक्षकाच्या घरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:16 IST2018-04-08T01:16:40+5:302018-04-08T01:16:40+5:30

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या अंगरक्षकाच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. यामध्ये लाखो रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 Theft in the house of Anandraj Ambedkar | आनंदराज आंबेडकरांच्या अंगरक्षकाच्या घरात चोरी

आनंदराज आंबेडकरांच्या अंगरक्षकाच्या घरात चोरी

मुंबई : रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या अंगरक्षकाच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. यामध्ये लाखो रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत.
परळच्या शापुरजी पालनजी कम्पाउंडमध्ये राकेश गायकवाड (३५) हे कुटुंबीयांसोबत राहतात. ते आनंदराज आंबेडकर यांचे अंगरक्षक, तसेच चालक म्हणून नोकरीला आहेत. त्यांच्या पत्नीची मालाड मालवणीमध्ये म्हाडाची रूम आहे. तेथील भाडेकरार संपल्याने, या आठवड्यात ते तेथे राहण्यास जाणार होते. त्यासाठी येथील घरातील सामान शिफ्ट करण्याचे काम सुरू होते. गुरुवारी दुपारी घरातील सामान घेऊन ते मालाडला गेले. रात्री ११ च्या सुमारास घरी परतले, तेव्हा घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तुटलेला दिसून आला. कपाटातील सोन्याचे दागिनेही गायब असल्याचे दिसून आले. यामध्ये जवळपास १ लाख किमतीचे दागिने चोरीला गेले. त्यांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. घटनेची वर्दी मिळताच काळाचौकी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी या प्रकरणी गायकवाड यांच्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title:  Theft in the house of Anandraj Ambedkar

टॅग्स :Crimeगुन्हा