हाजी अली दर्गा परिसरात जगातील सर्वात उंच तिरंगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:40 IST2026-03-12T13:39:46+5:302026-03-12T13:40:31+5:30

या उपक्रमामुळे परिसराचे सौंदर्य वाढेल व पर्यटनालाही चालना मिळेल, असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

The world's tallest tricolor in the Haji Ali Dargah area! | हाजी अली दर्गा परिसरात जगातील सर्वात उंच तिरंगा!

हाजी अली दर्गा परिसरात जगातील सर्वात उंच तिरंगा!

मुंबई : हाजी अली दर्गा येथे जगातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याचा प्रस्ताव असून, त्याकरिता राज्य सरकारकडे परवानगी मागण्यात आली आहे. ती मिळताच इतर परवानग्यांसाठी प्रक्रिया केली जाईल.हाजी अली दर्गा येथे सर्वधर्मीय भाविक दर्शनासाठी येतात, अशा ठिकाणी राष्ट्रध्वजामुळे देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास हाजी अली दर्गा व माहीम दर्गाचे विश्वस्त सुहैल खंडवानी यांनी व्यक्त केला. 
    
या उपक्रमामुळे परिसराचे सौंदर्य वाढेल व पर्यटनालाही चालना मिळेल, असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

एकता, कृतज्ञता, सामाजिक सलोख्याचे दर्शन 

हाजी अली दर्गा येथे वार्षिक ‘सेहरी’ कार्यक्रमात विविध धर्माच्या नेत्यांकडून एकता, कृतज्ञता आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याच्या परंपरांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सुहैल खंडवानी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सेहरीला मान्यवर उपस्थित होते. याचे आयोजन सुहेल खंडवानी, आसिफ दादरकर, अरशद सय्यद, रियाज सय्यद, तनवीर मर्चेंट, एम. फारुख घीवाला, तुराब दरवेश यांनी केले. असे कार्यक्रम सांस्कृतिक परंपरा जपण्यासोबत समाजातील सामाजिक एकात्मता अधिक बळकट करण्यास मदत करतात, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

हाजी अली दर्गा येथे पीर हाजी अली शाह बुखारी (र.अ) यांची कबर असून, भाविक येथे दर्शनासाठी येतात. वरळी येथील किनाऱ्यापासून ५०० यार्ड अंतरावर बेटावर हा दर्गा आहे. 

समुद्रामुळे येथे उंच ध्वज उभारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व उच्च दर्जाच्या धातूचा वापर केला जाणार आहे. सध्या जगातील सर्वात उंच राष्ट्रध्वज इजिप्तमधील कैरो येथे २०२ मीटरचा आहे व त्या खालोखाल सौदीमध्ये जेद्दाह येथे १७० मीटरचा आहे. 

हाजी अली येथे त्यापेक्षा उंच राष्ट्रध्वज उभारला जाईल, यासाठी सुरुवातीला १२ कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र आता परवानगी मिळाल्यानंतर नव्याने प्रक्रिया राबवली जाईल, अशी माहिती खंडवानी यांनी दिली.

Web Title : हाजी अली दरगाह के पास दुनिया का सबसे ऊंचा तिरंगा प्रस्तावित

Web Summary : हाजी अली दरगाह के पास दुनिया का सबसे ऊंचा राष्ट्रीय ध्वज लगाने का प्रस्ताव विचाराधीन है। इस पहल का उद्देश्य देशभक्ति और पर्यटन को बढ़ावा देना है, जिसके लिए टिकाऊपन के लिए उन्नत तकनीक का उपयोग किया जाएगा। 'सेहरी' कार्यक्रम एकता और सामाजिक सद्भाव को बढ़ावा देता है।

Web Title : World's Tallest Tricolor Flag Proposed Near Haji Ali Dargah, Mumbai

Web Summary : A proposal to erect the world's tallest national flag near Haji Ali Dargah is under review. The initiative aims to boost patriotism and tourism, using advanced technology for durability. A 'Seheri' program promotes unity and social harmony.

टॅग्स :Mumbaiमुंबई