Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोस्टल रोडवर वाजणार ‘जय हो’ची धून, साकारला भारतातला पहिला मेलडी रोड; कसं करणार काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 08:22 IST

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार लोकार्पण

मुंबई - वाहतूक कोंडीविरहित, वेगवान आणि सुखकर प्रवासाची साक्ष ठरलेल्या मुंबईतील धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर (मुंबई कोस्टल रोड) वाहनचालकांसाठी एक आगळावेगळा आणि अभिमानाचा अनुभव देणारी अभिनव संगीत संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. या रस्त्यावर विशेष तंत्रज्ञानयुक्त संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या संगीत मार्गावर (मेलोडी रोड) पट्ट्यांवरून वाहन गेल्यावर स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील ‘जय हो’ हे गाणे ऐकू येणार आहे. 

हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजता या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. वरळीकडे जाणाऱ्या भूमिगत बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर दुभाजकाला लागून असलेल्या पहिल्या मार्गिकेवरून ५०० मीटर पुढे संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या पट्ट्यांवरून ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहन नेल्यास ‘जय हो’ या गीताची धून वाहनात बसून ऐकू येते. रस्त्याच्या पृष्ठभागावर ठरावीक अंतरावर आणि विशिष्ट आकारात पट्टे बसविण्यात आले आहेत. 

अभियांत्रिकी, सांस्कृतिक अभिव्यक्तीचा संगमही संकल्पना आधुनिक अभियांत्रिकी आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचा अनोखा संगम आहे. ‘जय हो’ची धून अनुभवता येणारा हा रस्ता मुंबईच्या सांस्कृतिक आणि देशभक्तिपर ओळखीमध्ये आणखी भर घालणारा ठरणार आहे.

सुरुवात जपानमध्ये झालीया अभिनव संकल्पनेचा प्रसार सन २००७ मध्ये जपानमध्ये झाला. जपानमधील अभियंता शिझुओ शिनोडा (Shizuo Shinoda) यांनी बुलडोझरच्या साहाय्याने रस्त्यावर काम करत असताना हा ध्वनी परिणाम शोधून काढला. पुढे याच प्रयोगातून ‘मेलडी रोड’ ही संकल्पना विकसित झाली. आतापर्यंत हंगेरी, जपान, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती (युएई ) येथे असे प्रयोग करण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Coastal Road to Play 'Jai Ho': India's First Melody Road

Web Summary : Mumbai's Coastal Road features India's first 'melody road,' playing 'Jai Ho' when vehicles drive over specially designed strips. This innovative project, a blend of engineering and culture, is inaugurated February 11th, enhancing Mumbai's identity.
टॅग्स :देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे