Join us

‘एआय’च्या करिअरमुळे ‘सायन्स’चा कल वाढणार, ११वीसाठी विज्ञान शाखेला मिळणार पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:01 IST

वैद्यकीयसह अभियांत्रिकी क्षेत्रात नव्याने आलेले एआय, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा अशा उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमांची  ‘क्रेझ’  विद्यार्थ्यांमध्ये  आता वेगाने वाढते आहे.

मुंबई : वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणकशास्त्रासह आता ‘एआय’, सायबर विज्ञान, अवकाशशास्त्र यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल, तर अकरावीला विज्ञान शाखा घ्यावीच लागते. त्यातूनच ‘नीट’, ‘जेईई’, ‘सीईटी’सारख्या परीक्षांना पात्र होता येते. उच्चशिक्षणात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शेकडोंनी संधी उपलब्ध करून देणाऱ्या विज्ञान शाखेत अकरावीला प्रवेश घेण्यासाठी अधिक झुंबड उडते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. यंदाही त्याच परिस्थितीतून कट ऑफचा टक्का वाढणार यात शंकाच नाही, असेही मत व्यक्त होत आहे.

वैद्यकीयसह अभियांत्रिकी क्षेत्रात नव्याने आलेले एआय, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा अशा उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमांची  ‘क्रेझ’  विद्यार्थ्यांमध्ये  आता वेगाने वाढते आहे. त्या शिक्षणाचा पाया विज्ञान विषयावर आधारलेला असल्याने यापुढे अकरावीसाठीही या विज्ञान शाखेकडेच विद्यार्थ्यांचा कल वाढता राहण्याची शक्यता व्यक्त होत  आहे.सुदाम कुंभार, शिक्षण समुपदेशक

मागील वर्षीचा कट ऑफ जयहिंद कॉलेज    ९७.६ रुईया कॉलेज    ९६.२ के.सी.कॉलेज    ९५.८ वझे-केळकर कॉलेज    ९४.६ सीएचएम महाविद्यालय    ९४.६ बिर्ला महाविद्यालय, कल्याण    ९४.८ रूपारेल महाविद्यालय    ९१.२ साठ्ये महाविद्यालय    ९१.४ मिठीबाई महाविद्यालय    ९०.२ भवन्स महाविद्यालय, अंधेरी    ८६.४ ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे    ८१.६ बी.एन.बांदोडकर महाविद्यालय, ठाणे    ९२.६ फादर ॲग्नेल महाविद्यालय, वाशी    ९४.६

राजमार्ग व्यावसायिक अभ्यासक्रमांचा...विशेष म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जरी पात्र झाला नाही तरी त्याला विज्ञान शाखेसह अन्य कोणत्याही शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. ती संधी इतर शाखांना लागू होत नाही. बारावीनंतर आवडीनुसार शाखा बदल करण्याची सुविधाही अनेक विद्यार्थी घेत असतात. मागील वर्षी कट ऑफचे आकडे जय हिंद महाविद्यालयात ९७.६, रुईया कॉलेजमध्ये ९६.२ आणि के. सी. कॉलेजमध्ये ९५.८ इतके नोंदवण्यात आले होते. 

टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्सविद्यार्थी