Join us  

Breaking: १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठवली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 12:03 PM

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारने पाठवलेल्या यादीवर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता

नवी दिल्ली - विधानपरिषदेवर राज्यपालांनी नियुक्त करावयाच्या १२ आमदारांच्या स्थगिती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्थगिती कायम ठेवली होती. आता, सर्वोच्च न्यायालयाने या १२ आमदारांवरील स्थगिती उठवली असून आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारने पाठवलेल्या यादीवर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. गेल्यावर्षी सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेली नवी यादीही न्यायालयाच्या स्थगितीत अडकली आहे. त्यामुळे, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या स्थगितीवरील निर्णय अडकून पडला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली आहे. 

सप्टेंबर २०२२ पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना कोर्टात स्थगिती देण्यात आली होती. आता, आज ही स्थगिती उठवण्यात आली आहे. या आधी न्यायमूर्ती जोसेफ यांच्याकडे हे प्रकरण सुरू होते. पण ते निवृत्त झाल्यानंतर आता हे प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणीसाठी आले होते. त्यावर, सरन्यायाधींना सुनावणी करताना ही स्थगिती उठवली आहे. त्यामुळे, आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

दरम्यान, राज्यातील सत्ता बदलानंतर याबाबत एक वेगळी याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आधीची यादी परत पाठवली. हे कृत्य नियमात बसणारं नाही, असं सांगत न्यायालयात आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. 

टॅग्स :सर्वोच्च न्यायालयभगत सिंह कोश्यारीआमदारमुंबई