Join us

...अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही; मंगेश साबळेंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 21:28 IST

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची मोडतोड करणाऱ्या मंगेश साबळे आणि इतर दोघांचा मराठा समाजाने सत्कार केला.

प्रशांत माने

डोंबिवली: अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची मोडतोड केल्याप्रकरणी मराठा समाजाने गुरूवारी डोंबिवलीत मंगेश साबळे आणि इतर दोघांचा सत्कार केला. याप्रसंगी साबळे यांनी सांगितले की, आम्ही शांततेत आंदोलन करतोय सरकारने तत्काळ टिकणारे आरक्षण दयावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

मराठ्यांना माजलेले म्हणणं, त्यांना मी आरक्षण मिळवून देणार नाही असं म्हणणं, मराठ्यांच्या सभांना जत्रा म्हणणं हे मराठा समाजाच्या अस्मितेला खिजवणं आहे हे मराठा समाज कदापी सहन करणार नाही याकडे साबळे यांनी लक्ष वेधले. साबळे पुढे म्हणाले आरक्षणासाठी मराठा समाजातील तरूणांनो आत्महत्या करू नका. शांततेत समाजासाठी झटत राहा, तसं जमत नसेल तर जे आम्ही करतोय ते करा असे आवाहन साबळेंनी केले.

आपल्याला स्वातंत्र्य फक्त उपोषण करून मिळालेलं नाही स्वातंत्र्य भगतसिंग, राजगुरू यांच्यामुळे सुद्धा मिळालय. समाजाच्या विरोधात बोलणा-या सदावर्तेला कोणताही इशारा नाही मात्र समाजाचे माथे भडकवण्याचे जो काम करेल. त्याच्यामुळे जर समाजाचे नुकसान होत असेल आरक्षणाचा लढा मोडीत निघत असेल तर त्याची किंमत त्याला चुकवावी लागेल असा इशारा साबळे यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाच आम्ही स्वागत करतो. मात्र मुख्यमंत्र्यांनी ४० दिवसांपूर्वी शब्द दिला होता. जीआर काढतो तीस दिवसात, आरक्षण देतो मात्र तसं कुठेही झालेलं नाही म्हणून आता या राजकीय भाषणांवर राजकीय घोषणांवर आम्हाला विश्वास राहिलेला नाही आता आम्हाला ठोस उत्तर दया मराठा समाजाला टिकणारे आरक्षण हवं आहे असे साबळे म्हणाले.

 

टॅग्स :मराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटीलगुणरत्न सदावर्तेमुंबई