Join us
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून मालकिणीने भाडेकरूच्या अंगावर फेकला गरम चहा! गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 10:27 IST

पवई पोलिसात गुन्हा दाखल.

मुंबई : भाडेकरूसोबत झालेल्या किरकोळ वादात घर मालकिणीने महिलेच्या अंगावर गरम चहा फेकला. त्यात तिच्या खांद्याला दुखापत झाली असून या विरोधात पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवईतील मोरारजी नगर परिसरात हा प्रकार घडला.

तक्रारदार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी प्रधान (३७) या घरकाम करत असून अनिता इंगळे (३५) हिच्या घरात २ लाख रुपये हेवी डिपॉझिट देऊन राहतात. त्या दर महिन्याला वीज तसेच पाणी बिलाचे ९०० रुपयेदेखील इंगळेला वेळेत देतात. मात्र इंगळे ही यावरून भांडण काढत प्रधान यांना शिवीगाळ करायची.

• असाच प्रकार १३ जानेवारी रोजीदेखील घडला, प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ४ जानेवारीला लाइट आणि पाण्याचे बिल दिले होते. मात्र इंगळेने पुन्हा १३ जानेवारीच्या रात्री प्रधान यांना त्या विषयावरून शिवीगाळ करायला सुरुवात केली.

• दुसऱ्या दिवशी सकाळी तोच शिवीगाळ करण्याचा प्रकार सुरू असल्याने प्रधान या इंगळेला प्रत्युत्तर करायला गेल्या. तेव्हा इंगळेने थेट प्रधानच्या अंगावर गरम चहा फेकला.

• यात प्रधानचा डावा खांदा भाजून त्यांना दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी उपचारासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात धाव घेत उपचार घेऊन त्यानंतर पवई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई पोलीस