"देशाचं दैवत केवळ छत्रपती शिवाजी महाराजच!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 18:05 IST2024-12-23T18:03:23+5:302024-12-23T18:05:18+5:30
सतीश भिडे यांनी सावरकरांचे जीवनावरील ३१४७ वा गीत वीर विनायक कार्यक्रम सादर करताना सावरकरांच्या जीवनातील थरारक प्रसंग निवेदन व गायकीतून जिवंत केले.

"देशाचं दैवत केवळ छत्रपती शिवाजी महाराजच!"
भारतात किती कोटी देव आहेत हे मोजता येणं कठीण आहे पण देशाचं दैवत केवळ छत्रपती शिवाजी महाराजच आहेत असे भावपूर्ण उद्गार स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र गायक सतीश भिडे यांनी गुजरातमधील वापी टाउन येथील स्वामी समर्थ केंद्रात केले.
सदर कार्यक्रमात सतीश भिडे यांनी सावरकरांचे जीवनावरील ३१४७ वा गीत वीर विनायक कार्यक्रम सादर करताना सावरकरांच्या जीवनातील थरारक प्रसंग निवेदन व गायकीतून जिवंत केले.
जेष्ठ तबला वादक विकास सकोजी यांच्या साथीने सादर झालेल्या कार्यक्रमास जेष्ठ सामाजिक नेते माणिकराव पाटील, सुरेश ठाकरे, पुरषोत्तम पाटील व अनेक मराठी भाषिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्य़ा समाप्तीनंतर सर्व कलाकार मंडळींचा तसेच सौ. संघमित्रा भिडे यांचा सत्कार करण्यात आला. युवा नेते शिवम शिरसाठ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.