Join us
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांत मुंबई महापालिकेच्या शाळांची संख्या १५२ ने घटली; शिक्षण विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:55 IST

६ इंग्रजी शाळा, १८ मुंबई पब्लिक स्कूल शाळा वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पालिकेच्या सर्व माध्यमांतील एकूण प्राथमिक शाळांची संख्या गेल्या दहा वर्षांत १५२ ने  घटली आहे. २०१५ मध्ये सर्व माध्यमांच्या मिळून एकूण १,०८३ प्राथमिक शाळा होत्या. २०२४-२५ मध्ये ही संख्या ९३१ इतकी खाली आली आहे. त्यापैकी ६ इंग्रजी शाळा, १८ मुंबई पब्लिक स्कूल शाळा वाढल्या असल्याची माहिती पालिका शिक्षण विभागाकडून नुकतीच मिळाली आहे. 

२०१५ मध्ये मराठीच्या ३५० शाळा होत्या, त्या २०२४-२५ या वर्षी २५४ इतक्या आहेत. म्हणजे ९६ मराठी शाळा कमी झाल्या. हिंदीच्या २३२ शाळा होत्या, आता २१६ शाळा आहेत. म्हणजे १६  हिंदी शाळा कमी झाल्या आहेत. उर्दू शाळा २०४ वरून १८६ इतक्या झाल्या असून, १८ शाळा घटल्या आहेत. 

अन्य बोर्डांच्या २१ शाळा...

२०१५ मध्ये ५४  इंग्रजी शाळा होत्या. २०२४-२५ मध्ये ६० झाल्या असून, ६ शाळांची वाढ झाली आहे. मुंबई पब्लिक स्कूलच्या शाळांची संख्या २०१५ मध्ये ६१ होती ती आता २०२४ मध्ये ७९ झाली असून, १८ शाळांची वाढ झाली आहे. सीबीएसई, आयसीएसई व केंब्रिज संलग्न शाळा २०२१ मधील ११ वरून तीन वर्षांत २१ झाल्या आहेत. 

शाळांच्या संख्येतील घट अशी...

  • गुजराती     ६८ वरून ३८     ३० शाळांची घट 
  • तमीळ       ३५ वरून २६     ९ शाळांची घट 
  • तेलुगू        २८ वरून ९     १९ शाळांची घट 
  • कन्नड       ३४ वरून २३     १० शाळांची घट 
English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Municipal Schools Decline by 152 in Ten Years

Web Summary : Mumbai's municipal schools decreased by 152 in ten years, with Marathi, Hindi, and Urdu schools seeing the biggest drops. English and Mumbai Public Schools saw growth. Other boards increased to 21 schools.
टॅग्स :शाळा