Join us
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग उद्घाटनाचा नवीन मुहूर्त ठरला, एकनाथ शिंंदेंकडून आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 11:26 IST

मंत्री शिंदेंकडून आढावा

नागपूर : नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी सातत्याने ‘डेडलाइन’ हुकविणाऱ्या राज्य शासनाने आता नवीन मुदत जाहीर केली आहे. मे महिन्यात या महामार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्याचा शासनाचा मानस असून, दुसरा टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा दावा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.रविवारी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. वर्धा येथे जाऊन त्यांनी पाहणीदेखील केली.  मे महिन्यात समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा यासाठी विशेष आग्रह आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याअगोदर डिसेंबर २०२१ मध्येच पहिला टप्पा सुरू होईल. युद्धपातळीवर कामे झाली पाहिजेत यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, असा दावा शिंदे यांनी केला होता. मात्र, काम पूर्णच होऊ शकले नाही.

सूडभावनेतून कारवाई अयोग्यबृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरील कारवाई व जप्त झालेल्या डायरीबाबत बोलताना ते म्हणाले, मला नेमकी माहिती नाही. जर भ्रष्टाचाराबाबत योग्य पुरावे असतील तर केंद्रीय यंत्रणांनी नक्की चौकशी करावी. परंतु केवळ राजकीय सूडभावनेतून अशाप्रकारची कारवाई करणे योग्य नाही. लोकशाहीत अशा कारवाया बरोबर नाहीत.

टॅग्स :मुंबईशिवसेनाएकनाथ शिंदे