नवीन रक्तपेढीला वर्षाला गोळा करावे लागणार ३००० युनिट्स रक्त, राज्यात नवीन रक्तपेढी धोरण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:19 IST2026-01-31T13:19:47+5:302026-01-31T13:19:56+5:30

Crime News: राज्यात नवीन रक्तपेढी स्थापन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यात महानगर क्षेत्रात नवीन रक्तपेढीला वर्षभरात तीन हजार युनिट रक्त संकलन करावे लागणार आहे.

The new blood bank will have to collect 3000 units of blood per year, new blood bank policy announced in the state | नवीन रक्तपेढीला वर्षाला गोळा करावे लागणार ३००० युनिट्स रक्त, राज्यात नवीन रक्तपेढी धोरण जाहीर

नवीन रक्तपेढीला वर्षाला गोळा करावे लागणार ३००० युनिट्स रक्त, राज्यात नवीन रक्तपेढी धोरण जाहीर

मुंबई - राज्यात नवीन रक्तपेढी स्थापन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यात महानगर क्षेत्रात नवीन रक्तपेढीला वर्षभरात तीन हजार युनिट रक्त संकलन करावे लागणार आहे.

आरोग्य विभागाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये भौगोलिक वर्गीकरण, स्वेच्छा रक्तदान शिबिरांमधून रक्तसंकलनाची किमान मर्यादा,  एनओसी देण्याचे निकष स्पष्ट केले आहेत. त्यामुळे रक्तपेढी स्थापन करू इच्छिणाऱ्या संस्था/ट्रस्टने स्वेच्छा रक्तदान शिबिरांद्वारे दरवर्षी किमान ३००० युनिट्सपेक्षा अधिक रक्तसंकलन करण्याचे लेखी आश्वासन द्यावे लागेल तर शहरी, ग्रामीण व आदिवासी भागात नवीन रक्तपेढीसाठी किमान २००० युनिट्स रक्तसंकलनाचे लक्ष्य निश्चित केले आहे.  दोन वर्षांनंतर राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून आढावा घेतला जाईल.

घटक विभाजन  सुविधा अनिवार्य
ज्या संस्था/ट्रस्टकडे रक्त घटक विभाजन सुविधा उपलब्ध आहे अशांनाच नवीन रक्तपेढीसाठी एनओसी देण्यात येणार आहे. याशिवाय, प्लेटलेट्सची मागणी-पुरवठा तफावत भरून काढण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अफेरेसिस  सुविधा असलेल्या रक्तपेढींना प्राधान्य दिले जाणार आहे.

रुग्णालय आधारित रक्तपेढीसाठी निकष
रुग्णालयाला रक्तपेढीची परवानगी देण्यापूर्वी संबंधित रुग्णालयातील गरज जवळच्या रक्तपेढीशी संलग्न साठवण केंद्रातून भागवता येतील का, याचे स्पष्टीकरण  द्यावे लागेल तसेच खाटांची संख्या, हृदय, मूत्रपिंड किंवा इतर अवयव प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रिया व आपत्कालीन सेवांची उपलब्धता यांचाही विचार केला जाणार आहे. 
एनओसी मिळाल्यानंतर संबंधित रुग्णालयाला आसपासच्या ३ ते ४ रुग्णालयांना रक्त व रक्त घटक पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन द्यावे लागेल.
 २०० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांची क्षमता असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला रक्तपेढीसाठी एनओसी दिली जाईल. सरकारी रुग्णालयांना आरोग्य विभागाच्या गरजेनुसार रक्तपेढी सुरू करता येईल.

स्वतंत्र रक्तपेढीसाठी अतिरिक्त निकष 
महानगर, शहरी व ग्रामीण भागात स्वतंत्र रक्तपेढी स्थापनेसाठी एनओसी देताना संबंधित क्षेत्रातील रक्तपेढ्यांचे भौगोलिक मॅपिंग केले जाईल. त्यात विद्यमान रक्तपेढ्यांची संख्या व त्यांचे रक्तसंकलन विचारत घेतले जाईल तसेच परिसरातील रुग्णालयांची संख्या, रक्ताची गरज व वापर, तसेच विशेष शस्त्रक्रिया व सामान्य शस्त्रक्रियांच्या आधारे अतिरिक्त रक्तपुरवठ्याची आवश्यकता यांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.  

असे आहे भौगोलिक क्षेत्रांचे वर्गीकरण  
महानगर (शासनाने निश्चित केलेले)
शहरी (जिल्हा ठिकाण)
ग्रामीण (तालुका ठिकाण)
आदिवासी क्षेत्र

Web Title : नई रक्तपेढी नीति के अनुसार सालाना 3000 यूनिट रक्त संग्रह अनिवार्य।

Web Summary : महाराष्ट्र की नई रक्तपेढी नीति के अनुसार, महानगरों में रक्तपेढ़ियों को सालाना 3000 यूनिट रक्त एकत्र करना होगा। भौगोलिक वर्गीकरण और बुनियादी ढांचे की आवश्यकताएं परिभाषित हैं। घटक पृथक्करण अनिवार्य है। अस्पताल-आधारित रक्तपेढ़ियों को औचित्य, आपूर्ति प्रतिबद्धताओं की आवश्यकता है। स्वतंत्र बैंकों की मैपिंग समीक्षा होगी।

Web Title : New blood bank policy mandates 3000 unit collection annually.

Web Summary : Maharashtra's new blood bank policy requires metro blood banks to collect 3000 units annually. Geographic classifications and infrastructure needs are defined. Component separation is mandatory. Hospital-based blood banks need justification, supply commitments. Independent banks face mapping review.

टॅग्स :Mumbaiमुंबई