लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्ती आणि माजी मुख्य न्यायमूर्ती यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अवमानाची कारवाई का करू नये? याचे स्पष्टीकरण मागण्यासाठी उच्च न्यायालयाने सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या वडील सतीश सालियन यांची बाजू मांडणारे वकील नीलेश ओझा यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. या प्रकरणी न्यायालयाने २९ एप्रिलला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
कार्टाचा अवमानविद्यमान न्यायमूर्ती आणि माजी मुख्य न्यायमूर्तींवर ओझा यांनी निंदनीय आरोप केले असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यावर न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी पूर्णपीठाची नियुक्ती केली. उच्च न्यायालयाने यू-ट्यूब आणि एका वृत्तवाहिनीला ओझा यांनी ज्या पत्रकार परिषदेत न्यायमूर्तींवर आरोप केले त्या परिषदेचे व्हिडीओ हटविण्याचे निर्देश दिले. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांची बाजू मांडणारे ॲड. नीलेश ओझा यांनी दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे.