तरुणीने त्याला हवेतच घातली लग्नाची मागणी; विमानात जल्लोष, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 07:19 IST2024-08-29T07:19:18+5:302024-08-29T07:19:36+5:30

एक मुलगी आपल्या जागेवरून उठली आणि तिने केबिन कर्मचाऱ्यांकडे जात इथे एक विशेष घटना घडणार आहे, अशी घोषणा करण्याची विनंती केली. केबिन

The girl asked him for marriage in the air | तरुणीने त्याला हवेतच घातली लग्नाची मागणी; विमानात जल्लोष, व्हिडीओ व्हायरल

तरुणीने त्याला हवेतच घातली लग्नाची मागणी; विमानात जल्लोष, व्हिडीओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ही बातमी इंडिगोच्या भर हवेतील विमानात घडलेल्या प्रेमकथेची आहे. तर, गोष्ट अशी की, चंडीगड येथून उड्डाण घेतलेले विमान हवेत स्थिरावल्यानंतर ऐश्वर्या बन्सल नावाची एक मुलगी आपल्या जागेवरून उठली आणि तिने केबिन कर्मचाऱ्यांकडे जात इथे एक विशेष घटना घडणार आहे, अशी घोषणा करण्याची विनंती केली. केबिन कर्मचाऱ्यांनी तिला नेमके काय करायचे आहे हे विचारले. तिनेही सांगितल्यावर तिच्या विनंतीला कर्मचाऱ्यांनी आनंदाने होकार दिला. 

मग तशी घोषणा झाली आणि ऐश्वर्या थेट पोहोचली ती तिच्या मागच्या सीटवर बसलेल्या अमूल्य गोएल नावाच्या मित्राकडे. त्याला बाहेर येण्याची विनंती केली. त्यालाही क्षणभर ती बाहेर का बोलावत आहे हे उमजले नाही. पण, तो बाहेर आला आणि क्षणार्धात ऐश्वर्या तिच्या गुडघ्यावर बसली आणि माझ्याशी लग्न करशील का, अशी मागणी तिने त्याला घातली. 

प्रेमकथा व्हिडीओमध्ये केली कैद

- या सुखद आश्चर्याने सुखावलेल्या अमूल्यने तिच्या मागणीला होकार दिला आणि संपूर्ण विमानात टाळ्यांचा जल्लोष झाला. विमानातील ही प्रेमकथा सहप्रवाशाने व्हिडीओ रेकॉर्ड केली आहे. 

- ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर लाखो लोकांनी त्यावर आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: The girl asked him for marriage in the air

टॅग्स :Mumbaiमुंबई