Raj Thackeray on Local Body Election: "आता १०० टक्के खात्री पटली की, निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे", अशी संताप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला. वेगवेगळ्या प्रश्नांवर निरुत्तर राहिलेल्या निवडणूक आयुक्तांकडे बोट दाखवत राज ठाकरे यांनी निवडणूक आय़ोगाच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केला.
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतील आयुक्तांच्या उत्तराचा व्हिडीओ पोस्ट केला.
राज ठाकरे म्हणाले, 'तळपायाची आग मस्तकात गेली'
"आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता १०० टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे", अशा शब्दात राज ठाकरेंनी आयोगावर निशाणा साधला.
मग तुमच्या पदांचं काय करायचं? राज ठाकरेंचा सवाल
"दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यांवर प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहे, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांचं करायचं काय?", अशा शब्दात राज ठाकरेंनी आयोगाला सुनावले.
राज ठाकरे म्हणाले, 'ही क्लिप जरूर पहा'
"महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल... बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन", असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
Web Summary : Raj Thackeray criticizes the Election Commission after the local body election announcement. He questions its autonomy, calling it a puppet of the ruling party, citing unanswered questions about voter list irregularities. He urged citizens to watch the press conference clip to see the disrespect towards their vote.
Web Summary : स्थानीय निकाय चुनाव की घोषणा के बाद राज ठाकरे ने चुनाव आयोग की आलोचना की। उन्होंने इसकी स्वायत्तता पर सवाल उठाते हुए इसे सत्तारूढ़ दल की कठपुतली बताया और मतदाता सूची की अनियमितताओं के बारे में अनुत्तरित प्रश्नो का हवाला दिया। उन्होंने नागरिकों से प्रेस कॉन्फ्रेंस क्लिप देखने का आग्रह किया ताकि वे अपने वोट के प्रति अनादर को देख सकें।