मैत्रीची पन्नाशी, वेगळा हुरूप देणारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:33 IST2025-12-29T14:32:10+5:302025-12-29T14:33:51+5:30
सुसंस्कृत आणि उदार स्वभाव ही भन्साळी यांची वैशिष्ट्ये. त्यामुळेच ते इतका मोठा मित्रपरिवार जमा करू शकले, अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

मैत्रीची पन्नाशी, वेगळा हुरूप देणारी
मुंबई : वयाची ५० वर्षे पूर्ण करणे म्हणजे केवळ अर्धशतक होणे एवढेच मर्यादित नाही. पन्नास वर्षांत जमवलेला मित्रपरिवार, झालेल्या ओळखी आणि त्यातून आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा समाजाला करून देण्यासाठी घेतलेली भूमिका जास्त महत्त्वाची ठरते. नेमकी हीच संधी बॉम्बे हॉस्पिटलचे प्रख्यात डॉ. गौतम भन्साळी यांना साध्य करता आली. त्यांचा पन्नासावा वाढदिवस त्यांनी मुंबईत एका देखण्या आणि एकमेकांशी जोडलेल्या आपुलकीच्या भावनेतून साजरा केला. या कार्यक्रमासाठी राजकारण, प्रशासन, चित्रपट सृष्टी आणि सामाजिक अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुसंस्कृत आणि उदार स्वभाव ही भन्साळी यांची वैशिष्ट्ये. त्यामुळेच ते इतका मोठा मित्रपरिवार जमा करू शकले, अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. या सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, उदित नारायण, मनोज मुन्तशिर, अनु मलिक, मुकेश ऋषी, तोशी साब्री, शारीब साब्री, अविनाश मुखर्जी, जगदीश चंद्रा, अनिल शर्मा, देबिना बॅनर्जी, गुरमीत चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
इतर उल्लेखनीय पाहुण्यांमध्ये रवी गोएंका (अध्यक्ष, लक्ष्मी ऑर्गानिक), बी. के. तापडिया (अध्यक्ष, बॉम्बे हॉस्पिटल), बी. के. गोएंका, निरंजन हिरानंदानी, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, प्रधान सचिव पराग जैन, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, सिडकोचे एमडी विजय सिंगल, सीईओ एसआरए महेंद्र कल्याणकर यांच्यासह डॉ. बी. एस. सिंघल, डॉ. साधना देसाई, डॉ. अरुण मुळाजी, डॉ. अमित मायदेव, डॉ. झुंझुनवाला, डॉ. अश्विन मेहता, डॉ. अशोक गुप्ता, डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ. तात्याराव लहाने आदींची उपस्थिती होती.