एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत; प्रवाशांचा मोठा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 09:43 IST2022-09-18T09:42:18+5:302022-09-18T09:43:08+5:30

कळवा कारशेडमधून प्रवाशांची पायपीट

The doors of AC Local did not open; A major disruption for passengers | एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत; प्रवाशांचा मोठा खोळंबा

एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत; प्रवाशांचा मोठा खोळंबा

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : ठाणे स्थानकात शुक्रवारी रात्री ११.४४ च्या सुमारास आलेल्या एका एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना थेट कळवा कारशेडमध्ये जावे लागले. त्यामुळे काही प्रवाशांना मन:स्ताप झाला. जागरूक प्रवाशाने ही बाब ट्विटरद्वारे रेल्वे प्रशासनाच्या आणि नागरिकांच्या निदर्शनास आणली. यापूर्वी एसी लोकलचे दरवाजे न उघडण्याचा प्रकार दादर स्थानकात घडला होता. 

याबाबत मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, सीएसएमटीहून ठाण्यापर्यंत डाऊन मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलचे दरवाजे शुक्रवारी उघडले नाहीत, ही माहिती समाजमाध्यमांवरील संदेशांमुळे समजली. संबंधित लोकलच्या गार्डशी बोलणे झाले, तेव्हा त्यांनी दरवाजे उघडण्याचे बटन दाबल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ठाणे स्थानक मॅनेजर यांच्याशी बोलणे झाले असून, त्यांनी लोकल स्थानकात आल्यावर नेहमीप्रमाणे दरवाजे उघडले की नाही, तसेच प्रवासी उतरले की नाही, याबाबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असल्याचे सांगितले. त्यानंतर जी माहिती निदर्शनास येईल ती वरिष्ठ पातळीवर दिली जाईल, असे सुतार यांनी स्पष्ट केले.

Web Title: The doors of AC Local did not open; A major disruption for passengers