लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या महिलांच्या डब्यातील एका बाजूचा दरवाजा दोन दिवसांपासून पूर्ण बंद असून, त्याची दुरुस्ती का केली जात नाही, असा सवाल महिला प्रवाशांनी केला. बुधवारी त्या बंद दरवाजाचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्या फोटोवरून नागरिकांनी रेल्वेवर टीकेची झोड उठवून नाराजी व्यक्त केली.
दिवसभर लोकल सुरू असल्या तरी रात्रीच्या वेळेत एसी लोकल बंद असताना त्या दरवाजाची देखभाल दुरुस्ती का केली नाही. प्रवाशांच्या हालअपेष्टांबाबत रेल्वेला काहीच का वाटत नाही, असा सवाल करण्यात आला. दरवाजा, डब्याचा नंबर असे फोटो व्हायरल झाले. त्या बंद दरवाजावर कागद चिकटवून त्यावर दुसऱ्या दरवाजाचा वापर करावा, असे लिहिले आहे.