ठाणे पालिका आयुक्तांचा कारभार व्हॉट्स अ‍ॅपवरून

By admin | Published: July 7, 2015 02:41 AM2015-07-07T02:41:21+5:302015-07-07T02:41:21+5:30

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपला क ारभार व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून सुरू केल्याने पालिकेतील बहुतेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Thane municipal commissioner's governance from the What's app | ठाणे पालिका आयुक्तांचा कारभार व्हॉट्स अ‍ॅपवरून

ठाणे पालिका आयुक्तांचा कारभार व्हॉट्स अ‍ॅपवरून

Next


ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपला क ारभार व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून सुरू केल्याने पालिकेतील बहुतेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. रात्री-अपरात्री आयुक्त यावरून मेसेज करून काही आदेशही देऊ लागले आहेत. त्यामुळे अधिकारीवर्ग आता रात्रीही अपडेट राहू लागला आहे. परंतु, ज्या अधिकाऱ्यांकडे अद्यापही स्मार्ट फोन नाहीत, अशा अधिकाऱ्यांना आता तो घेण्याचा सल्ला आयुक्तांनी दिला आहे. परंतु, तरीही जे अधिकारी तो घेण्यास नकार देतील, ते अडचणीत येतील, असा इशारा पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला आहे.
ठाणे महापालिका आयुक्तांनी व्हॉट्स अ‍ॅपवर पालिकेतील सर्व अधिकाऱ्यांसाठी एक ग्रुप तयार केला आहे. त्या माध्यमातून सध्या शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, दिवे, पाणी, कचरा, वृक्षतोड आदींसह इतर माहिती अपडेट ठेवली जात आहे. आलेल्या प्रत्येक तक्रारीवर कशा पद्धतीने कारवाई केली जाते, याचीही माहिती घेतली जात आहे.
विशेष म्हणजे एखादे काम झाल्यानंतर त्याचे
अपटेड ग्रुपवर टाकले न गेल्यास संबंधित अधिकाऱ्याला रात्री ११ वाजता खुलासा करण्याची वेळ येत असल्याचे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु, आजही पालिकेतील बहुतांश अधिकारी अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे स्मार्ट फोन असले तरी त्यांचा स्मार्ट वापर प्रशासनासाठी अपवादानेच होत आहे. त्यातही भविष्यात स्मार्ट फोन हातात आल्यास स्मार्ट काम करावे लागण्याची शक्यता असल्याने अनेक अधिकाऱ्यांनी तो वापरणे टाळल्याची चर्चा आहे.
दरम्यान, भविष्यात महापालिकेचे विविध अ‍ॅप सुरू करण्याचा आयुक्तांचा विचार आहे. अशा वेळी या संगणकक्र ांतीला अधिकाऱ्यांनी अवगत व्हावे, यासाठी अधिकाऱ्यांबरोबर ई-मेलद्वारे संवाद साधण्यावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे कायम फायलींच्या जंजाळात अडकलेले अधिकारी ई-मेलद्वारे आपल्या प्रकल्प अथवा कामाची माहिती तत्काळ आयुक्तांना उपलब्ध करून देत आहेत. त्याच वेळी कायम लालफितीच्या कारभारात फायलींची हलवाहलव करणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र ही पद्धत अद्याप पचनी पडलेली नाही.
या मूठभर अधिकाऱ्यांना प्रसंगी बाजूला सारून काम करण्याची तयारी सुरू असल्याने त्यांनीही या ग्रुपवर जाण्यास सुरुवात केली आहे. त्याच वेळी इंटरनेट असो किंवा नसो आयुक्त कोणत्याही क्षणी आॅनलाइन येत असल्याने थेट नागरिकांच्या संबंधित असलेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये कायम धडकी भरविणारे वातावरण आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thane municipal commissioner's governance from the What's app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.