ग्रँटरोडमध्ये महागाईविरोधात युवासेनेकडून थाळी बाजाव आंदोलन; लाडू वाटून भाजपचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 17:34 IST2022-04-03T17:31:51+5:302022-04-03T17:34:15+5:30
मुंबईतील मलबारहिल विधानसभेचे युवासेना अधिकारी हेमंत दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रँटरोड येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला आणि औषधांच्या दरवाढीविरोधात थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.

ग्रँटरोडमध्ये महागाईविरोधात युवासेनेकडून थाळी बाजाव आंदोलन; लाडू वाटून भाजपचा केला निषेध
मुंबई - युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आवाहनानुसार इंधन, गॅस दरवाढीविरोधात युवासेनेकडून राज्यभर थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.
मुंबईतील मलबारहिल विधानसभेचे युवासेना अधिकारी हेमंत दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रँटरोड येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला आणि औषधांच्या दरवाढीविरोधात थाळी बजाव आंदोलन करण्यात आले. तसेच नागरिकांना लाडू वाटून निषेध करण्यात आला.
ग्रँटरोडमध्ये महागाईविरोधात युवासेनेकडून थाळी बाजाव आंदोलन; लाडू वाटून भाजपचा केला निषेध#ShivSena#inflation#BJPpic.twitter.com/GO3AMnbvmt
— Lokmat (@lokmat) April 3, 2022
राज्यात करण्यात येणाऱ्या ईडीच्या कारवाईविरोधात महाविकास आघाडी केंद्र सरकारवर वारंवार टीका करत आहे. आता महागाईच्या मुद्द्यावरुनही केंद्रविरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली आहे. फक्त मुंबईतच नाही, राज्यात अनेक ठिकाणी महागाईविरोधात थाळीबजाओ आंदोलनं करण्यात आली आहेत.