थायलंड फिरून परतला, पण एकटा नाही...! तरुणाची बॅग उघडताच मुंबई विमानतळावर सगळ्यांनाच बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:15 IST2025-06-03T13:15:24+5:302025-06-03T13:15:56+5:30

मुंबई विमानतळावर तपासणी करताना अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून तब्बल ४७ विषारी साप आणि पाच कासवे जप्त केली.

Thailand Return Indian national arrested by the Customs Officers from Mumbai Airport for bringing 47 snakes and 5 turtles | थायलंड फिरून परतला, पण एकटा नाही...! तरुणाची बॅग उघडताच मुंबई विमानतळावर सगळ्यांनाच बसला धक्का

थायलंड फिरून परतला, पण एकटा नाही...! तरुणाची बॅग उघडताच मुंबई विमानतळावर सगळ्यांनाच बसला धक्का

विमानतळावर तपासणी करताना अनेकदा प्रवाशांच्या बॅगांमधून वेगवेगळ्या गोष्टी जप्त केल्या जातात. अनेकदा लोक सोनं, महागड्या वस्तु ते अगदी ड्रग्सपर्यंत अनेक गोष्टींची तस्करी करतात. मात्र, आता मुंबई विमान तळावरून ताब्यात घेतलेल्या एका प्रवाशाच्या बॅगमधून अतिशय धक्कादायक गोष्टी बाहेर पडल्या आहेत. मुंबईविमानतळावर तपासणी करताना अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून तब्बल ४७ विषारी साप आणि पाच कासवे जप्त केली.

बॅगेत होते ४७ साप आणि ५ कासवे!

प्रवाशाच्या बॅगेत साप पाहून अधिकारीही चक्रावून गेले होते. हा प्रवासी थायलंड फिरून परतला होता. तो बँकॉकहून विमानाने भारतात परतला होता. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी दरम्यान त्याच्या बॅगमध्ये ४७ अत्यंत विषारी साप आणि ५ कासवे आढळून आली. हा प्रवासी बाहेर पडत असताना अधिकाऱ्यांना संशय आला, त्यामुळे त्याला तपासणीसाठी थांबवण्यात आले होते. त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल!

याबद्दल माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेस्क्विंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरच्या पथकाने या साप आणि कासवांच्या प्रजाती ओळखण्यास मदत केली. आता हे साप आणि कासव वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत पुन्हा त्या देशात परत पाठवले जातील. सुरक्षा संस्थांनी संबंधित कलमांखाली प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रवाशाविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. 

या प्रवाशाच्या बॅगेत सापडलेल्या साप आणि कासवांमध्ये ३ स्पायडर टेल्ड होर्नेड व्हायपर, ४४ इंडोनेशियन पिट व्हायपर आणि ५ एशियन लीफ टर्टल यांचा समावेश होता. आता भारतातील विवध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत साप आणि कासव जप्त करण्यात आले आहेत.     

Web Title: Thailand Return Indian national arrested by the Customs Officers from Mumbai Airport for bringing 47 snakes and 5 turtles