मालाडमध्ये २ गटात तणाव; शोभा यात्रेसाठी भगवा झेंडा घेऊन जाणाऱ्या २ तरुणांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:38 IST2025-03-31T13:35:02+5:302025-03-31T13:38:36+5:30

याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. विश्व हिंदु परिषद, बजरंग दल या संघटना पोलीस स्टेशनला दाखल झाल्या.

Tension between 2 groups in Malad; 2 youths carrying saffron flags for Shobha Yatra beaten up | मालाडमध्ये २ गटात तणाव; शोभा यात्रेसाठी भगवा झेंडा घेऊन जाणाऱ्या २ तरुणांना मारहाण

मालाडमध्ये २ गटात तणाव; शोभा यात्रेसाठी भगवा झेंडा घेऊन जाणाऱ्या २ तरुणांना मारहाण

मुंबई - गुढीपाडव्याच्या संध्याकाळी मालाड पूर्व येथे निघालेल्या कलश यात्रेदरम्यान २ गटात तणाव निर्माण झाला. भगवा झेंडा फडकवणाऱ्या २ तरुणांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. पिंपरीपाडा येथील शोभा यात्रेत जात असताना या तरुणांनी झेंडा फडकवल्यावरून वाद झाला. त्यानंतर या तरुणांना मारहाण झाली. या प्रकरणी ४ जणांना अटक केली आहे. ज्याठिकाणी राडा झाला तिथे सध्या तणावाची परिस्थिती असून पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. 

या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ज्या लोकांनी हे कृत्य केले. हिंदू समाजावर हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या लोकांना अटक करावी. जर हिंदू समाजातील तरूण भगवा झेंडा घेऊन जात असतील तेव्हा औरंगजेब प्रवृत्तीचे काही लोक त्यांना हे बघवत नाही. त्यामुळे हा हल्ला झाला. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी बजरंग दलाचे गौतम रावरिया यांनी म्हटलं.

तर मालाडमधील घटना गंभीर आहे. माध्यमातून ही घटना पाहायला मिळाली. जर अशा प्रवृत्ती नववर्षाच्या दिवशी हिंदू सणाला अशाप्रकाराने वागणार असतील तर ही प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपला सण साजरा करावा. दुसऱ्याच्या सणात व्यत्यय आणणं, मारहाण करणे योग्य नाही. या प्रकाराची निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह खाते दखल घेतील आणि संबंधितांवर योग्य कडक कारवाई होईल असं भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

नेमकी काय घटना घडली?

मालाड पूर्व येथे गुढीपाडवानिमित्त शोभा यात्रा निघाली होती. त्यावेळी पठाणवाडी भागात २ युवक मागे राहिले होते. हे दोन्ही युवक हातात भगवा झेंडा घेऊन रिक्षातून जात होते तेव्हा काही समाजकंटकांनी त्यांना रोखले. त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी मोठा जमाव तिथे जमला. या दोन्ही युवकांना तिथे मारण्यात आले. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. विश्व हिंदु परिषद, बजरंग दल या संघटना पोलीस स्टेशनला दाखल झाल्या. कुरार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मॉब लिचिंगचा गुन्हा दाखल करून आरोपींना तातडीने अटक करा अशी मागणी करण्यात येत आहे. 
 

Web Title: Tension between 2 groups in Malad; 2 youths carrying saffron flags for Shobha Yatra beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.