आचारसंहिता संपताच निविदांचा पडला पाऊस; महिनाभरात ६०० कोटींच्या ३६१ निविदा प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 06:09 IST2026-02-14T06:09:57+5:302026-02-14T06:09:57+5:30

या निविदांच्या माध्यमातून मुंबईतील विविध नागरी आणि पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Tenders poured in as soon as the code of conduct expired; 361 tenders worth Rs 600 crores were published in a month in BMC | आचारसंहिता संपताच निविदांचा पडला पाऊस; महिनाभरात ६०० कोटींच्या ३६१ निविदा प्रसिद्ध

आचारसंहिता संपताच निविदांचा पडला पाऊस; महिनाभरात ६०० कोटींच्या ३६१ निविदा प्रसिद्ध

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपताच पालिकेने निविदांचा धडाका लावला आहे. गेल्या महिनाभरात पालिकेने सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाच्या ३६१ निविदा काढल्या असून, त्यांपैकी ३५५ निविदा सध्या प्रत्यक्ष प्रक्रियेत आहेत.

निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेमुळे १५ डिसेंबर ते १६ जानेवारी या काळात पालिका प्रशासनाला एकही नवीन निविदा काढता आली नव्हती. साधारणपणे पालिकेत दर आठवड्याला ५ ते १० निविदा निघतात. मात्र, आचारसंहितेमुळे कामांचा मोठा डोंगर साचला होता. हा विलंब टाळण्यासाठी १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या अल्प कालावधीत ३६१ निविदांचा पाऊस पाडण्यात आला. या निविदांच्या माध्यमातून मुंबईतील विविध नागरी आणि पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ७ मार्च २०२२ रोजी पालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यापासून पालिकेचा कारभार प्रशासकांमार्फत चालवला जात होता. महापौर रितू तावडे यांनी नुकताच पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. 

ही होणार कामे...
रस्ते आणि सांडपाणी : पूर्व उपनगरातील रस्त्यांची कामे आणि वांद्रे येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची दुरुस्ती.
आरोग्य आणि शिक्षण : पालिकेच्या केईएम रुग्णालयातील दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.
स्वच्छता आणि प्रदूषण : बोरिवलीत कचरा संकलनासाठी वाहने भाड्याने घेणे, मालाडमध्ये ड्रेनेज दुरुस्ती आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी ‘मिस्ट स्प्रे’ मशीनची खरेदी करणे.

Web Title : आचार संहिता खत्म होते ही मुंबई नगर निगम में निविदाओं की बाढ़, ₹600 करोड़

Web Summary : चुनाव आचार संहिता के बाद, मुंबई नगर निगम ने ₹600 करोड़ की निविदाएं जारी कीं। इनमें सड़कें, स्वच्छता, स्वास्थ्य सेवा, शिक्षा, कचरा प्रबंधन और प्रदूषण नियंत्रण परियोजनाएं शामिल हैं, जिसका उद्देश्य देरी के बाद बुनियादी ढांचे में सुधार करना है।

Web Title : Mumbai Municipality Flooded with Tenders Post-Code of Conduct, Worth ₹600 Crore

Web Summary : Following the election code of conduct, Mumbai Municipality released ₹600 crore worth of tenders. These cover roads, sanitation, healthcare, education, waste management, and pollution control projects across the city, aiming to improve infrastructure after delays.