भांडूप येथे टेम्पोचालकाची संशयास्पद आत्महत्या

By Admin | Updated: May 3, 2014 14:51 IST2014-05-03T13:23:35+5:302014-05-03T14:51:44+5:30

भांडूप येथे दरवाजाच्या बाहेरील कडीला टॉवेलने गळफास घेतलेला हरिश्चंद्र बबन घोरपडे (३४) या टेम्पोचालकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.

Tempo driver suspicious suicide at Bhandup | भांडूप येथे टेम्पोचालकाची संशयास्पद आत्महत्या

भांडूप येथे टेम्पोचालकाची संशयास्पद आत्महत्या

मुंबई: भांडूप येथे दरवाजाच्या बाहेरील कडीला टॉवेलने गळफास घेतलेला हरिश्चंद्र बबन घोरपडे (३४) या टेम्पोचालकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.
हरीशचंद्र हा तुलशेतपाडा येथील लक्ष्मीबाई चाळीत पत्नी आणि मुलासोबत राहात होता. काही दिवसांपूर्वी शाळेला सुटी पडल्याने त्याची पत्नी आणि मुलगा गावी गेले होते. शुक्र वारी मध्यरात्री घराशेजारी राहाणारा मावसभाऊ सुर्यकांत जांभळे यांच्याकडे जेवण करून हरिश्चंद्र एक वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला. सुर्यकांतने आतून घराची कडी लावून झोपायला गेले. हातात टॉवेल घेऊन बाहेर पडलेल्या हरिश्चंद्र याचा मृतदेह पहाटे चारच्या सुमारास दाराच्या बाहेरच्या कडीला गळफास घेतलेल्या अवस्थेत स्थानिकांना आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हरि›ंद्रला मुलुंडच्या अग्रवाल रु ग्णालयात नेले. डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच तो मृत झाल्याचे घोषित केले.
याप्रकरणी अधिक तपास सुरु असून हरिश्चंद्रचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी भांडूप पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून ही हत्या की आत्महत्या याचा तपास सुरु असल्याचे पोसिांनी सांगितले.

Web Title: Tempo driver suspicious suicide at Bhandup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.