Join us

तेलतुंबडे यांच्या एनआयए  कोठडीत २५ एप्रिलपर्यंत  वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 19:05 IST

विशेष न्यायलयातील न्या. वानखेडे यांनी त्यांना 25 एप्रिल रोजी कोर्टात हजर करण्याची सूचना केली आहे.

 

मुंबई :  एल्गार परिषदे  प्रकरणी अटकेत असलेल्या  डाव्या विचारसरणीचे जेष्ठ लेखक प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या विशेष तपास यंत्रणेकडील (एनआयए) कोठडी शनिवारी आणखी सात दिवसांनी वाढविण्यात आली.  विशेष न्यायलयातील न्या. वानखेडे यांनी त्यांना 25 एप्रिल रोजी कोर्टात हजर करण्याची सूचना केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार मंगळवारी मुंबईच्या एनआयए कार्यालयातहजर झाले होते. शहरी नक्षलवाद आणि एल्गार परिषदत प्रभोषक वक्तव्य केली, आणि माओवादी चळवळीच्या माध्यमातून देशविरोधी कारवाईत भाग घेतल्याचा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातजावई प्रा. तेलतुंबडे, गौतम नवलखा आणि अन्य 9 जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.  नवलखा एनआयएच्या दिल्ली कार्यालयाच्या ताब्यात आहेत. शनिवारी तेलतुंबडे यांच्या   कोठडीची मुदत संपल्याने त्यांना  विशेष न्यायालयात हजर करण्यात आले, त्यांच्याकडे गुन्ह्यांचा तपास प्रलंबित असल्याचे सांगून आणखी 7 दिवसाची मागणी केली. त्यानुसार त्याचा ताबा 25 एप्रिल एप्रिलपर्यंत  ठेवण्याचे  आदेश दिले.  पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांच्या सह 21 जणांविरोधात गंभीर आरोप असलेले गुन्हे नोंंदविले आहेत. यामध्ये काहीजण नक्षलवादी संघटनांंशी संबंध असल्याचा आरोपही आहे.

टॅग्स :महाराष्ट्रन्यायालय