लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सत्तेला सत्य सांगण्याचे, अन्यायाला आव्हान देण्याचे आणि वंचितांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचे आवाहन न्या. रेवती मोहिते डेरे यांनी उच्च न्यायालयाने गुरुवारी आयोजित केलेल्या निरोप समारंभात वकिलांना केले. त्या लवकरच मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
बारसाठी मी एवढेच सांगू इच्छिते की, वकील म्हणून तुमची जबाबदारी संविधानाप्रती आहे. न्याय आणि सत्याचे पुरस्कर्ते होण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे निर्भयपणे बोला, युक्तिवाद करा आणि जे योग्य आहे त्यासाठी ठामपणे उभे राहा. तुमचा प्रामाणिकपणा आणि धैर्य समाजावर दीर्घकालीन प्रभाव टाकेल. न्या. रेवती मोहिते डेरे म्हणाल्या, “न्याय मिळवून देण्याची ताकद तुमच्या हाती आहे. केवळ अशिलांचे प्रतिनिधित्व करू नका, तर ते ज्या कारणास्तव तुमच्याकडे आले आहेत, त्याला महत्त्व द्या.”
न्या. रेवती मोहिते-डेरे यांचा जीवन प्रवास...
पुण्यात जन्मलेल्या न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी सिम्बायोसिस लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर केंब्रिज विद्यापीठातून एलएलएम केले आहे. २१ जून २०१३ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली, तर २ मार्च २०१६ रोजी त्या कायमस्वरूपी न्यायमूर्ती झाल्या. न्या. रेवती मोहिते-डेरे आता मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी विराजमान होणार आहेत.
न्यायाधीशांचे काम काय?
‘न्यायाधीशांचे काम केवळ कायद्याचा अर्थ लावणे इतकेच नाही, तर न्यायव्यवस्थेवर लोक विश्वास ठेवतात त्याचे रक्षण करणे हेही त्यांचे कर्तव्य आहे, हे मी येथे शिकले. न्यायाच्या शोधात येणाऱ्या लोकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास प्रत्येक निर्णयाला अर्थ देतो,’ असे प्रतिपादन न्या. डेरे यांनी केले. न्यायपालिका आपल्यासाठी केवळ व्यवसाय नव्हे, तर एक ध्येय होते. नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण, संविधानाचे रक्षण आणि लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडविण्याची एक संधी म्हणून माझ्या पदाकडे पाहते, असे त्या म्हणाल्या.
Web Summary : Justice Revati Dere urged lawyers to uphold justice, challenge injustice, and stand for the vulnerable. She emphasized their role in protecting the constitution and people's rights, viewing her position as a mission, not just a profession, during her farewell.
Web Summary : जस्टिस रेवती डेरे ने वकीलों से न्याय बनाए रखने, अन्याय को चुनौती देने और कमजोरों के लिए खड़े होने का आग्रह किया। उन्होंने संविधान और लोगों के अधिकारों की रक्षा में उनकी भूमिका पर जोर दिया, और अपने पद को केवल एक पेशे के रूप में नहीं, बल्कि एक मिशन के रूप में देखा।