मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसारा-आसनगाव स्थानकादरम्यान रेल्वेसेवा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 09:01 IST2018-08-24T08:54:54+5:302018-08-24T09:01:51+5:30
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसारा-आसनगाव स्थानकादरम्यान रेल्वेसेवा ठप्प
मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. खर्डी रेल्वे स्थानकाजवळ भुसावळ-पुणे एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचीमुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा-आसनगाव स्थानकादरम्यान रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
मध्य रेल्वे मार्गावर शुक्रवारी (24 ऑगस्ट) सकाळीच लोकलमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऑफिस कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना लोकल बिघाडामुळे कामावार पोहोचण्यास उशीर होणार आहे. कसारा-आसनगाव स्थानकादरम्यान भुसावळ-पुणे एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून रेल्वे प्रशासनाकडून तातडीने याची दखल घेण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असेल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.