सव्वा तासाच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 13:44 IST2018-09-15T12:50:22+5:302018-09-15T13:44:58+5:30
अंबरनाथ-बदलापूर दरम्यान हैदराबाद एक्स्प्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने कर्जतहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती.

सव्वा तासाच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत
मुंबई : शनिवारी (15 सप्टेंबर) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली वाहतूक तासाभरानंतर आता सुरळीत झाली आहे. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान हैदराबाद एक्स्प्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने कर्जतहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. अंबरनाथपासून पुढे सीएसएमटी रेल्वे सेवा सुरळीत आहे. मात्र कर्जत ते अंबरनाथ रेल्वेसेवा काही वेळ पूर्णपणे ठप्प होती.
मध्य रेल्वे मार्गावर हा बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. अंबरनाथ-बदलापूर दरम्यान हा बिघाड झाला होता. रेल्वे प्रशासनाकडून तातडीने याची दखल घेतली. एक्सप्रेसला खेचण्यासाठी एक अतिरिक्त इंजिन मागवण्यात आलं. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.