आयडॉल विषयाच्या दुसऱ्या पेपरलाही तांत्रिक बिघाडाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 15:00 IST2020-10-06T14:59:42+5:302020-10-06T15:00:34+5:30
हेल्पलाइन क्रमांकावर सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत. परीक्षा होणार की नाही की पुढे ढकलली जाणार याचे ही स्पष्टीकरण हेल्पलाईन किंवा विद्यापीठाकडून मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आयडॉल विषयाच्या दुसऱ्या पेपरलाही तांत्रिक बिघाडाचा फटका
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेदरम्यान आयडॉलच्या दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्याना परीक्षा देता आली नाही. अनेक विद्यार्थ्यांना लिंक मिळाली मात्र, लॉग इन होत नसल्याने परीक्षा देता आली नाही, तर अनेकांचा लिंक ओपन होऊनही स्क्रीनवर काहीच येत नसल्याने गोंधळ उडाला.
हेल्पलाइन क्रमांकावर सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत. परीक्षा होणार की नाही की पुढे ढकलली जाणार याचे ही स्पष्टीकरण हेल्पलाईन किंवा विद्यापीठाकडून मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. तांत्रिक कारण दुरुस्त करण्याचे काम विद्यापीठकडून सुरू आहे. दरम्यान आजच परीक्षा घेऊ विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा व चिंता करू नये असे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे.