Join us

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कुर्ला-विद्याविहारदरम्यान तांत्रिक बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 07:51 IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळीच कामासाठी बाहेर पडलेल्या लेल्या प्रवाशांचे हाल सुरु आहेत.

मुंबई - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळीच कामासाठी बाहेर पडलेलल्या प्रवाशांचे हाल सुरु आहेत. कुर्ला ते विद्या विहारदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने ही लोकल वाहतूक काही काळासाठी बंद झाली आहे. तर सीएसएमटीकडे जाणारी वाहतूकही रखडली आहे. 

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांच्या दैनिक कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. अनेक प्रवाशी रेल्वे स्थानकांवरच अडकले आहेत. लोकलच्या प्रतिक्षेत प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच पर्यायी मार्गही नसल्यामुळे प्रवाशांना रेल्वेसेवा सुरूळीत होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे किंवा लोकल रेल्वेकडून वळविण्यात आलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. कुर्ला ते विद्याविहार मार्गादरम्यान तांत्रिक बिघाड झाला असून त्याच्या दुरूस्तीचे काम सुरु आहे. मात्र, या बिघाडामुळे सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक रखडली आहे. तर धीम्या मार्गावरील वाहतूकही जलद मार्गावर वळविण्यात आली आहे. दरम्यान, लवकरच वाहतूक सुरूळीत होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :मुंबई लोकललोकलकुर्ला