मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ तांत्रिक बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 07:09 IST2019-06-05T07:09:20+5:302019-06-05T07:09:34+5:30
स्टेशनवर गर्दी असल्याने प्रवाशांना मुंबईकडे येण्यासाठी नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ तांत्रिक बिघाड
मुंबई - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डोंबिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली असून मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटे उशीराने धावत आहेत.
आज रमजान ईद असल्याने बहुतांश ठिकाणी सुट्टीचा दिवस आहे. मात्र स्टेशनवर गर्दी असल्याने प्रवाशांना मुंबईकडे येण्यासाठी नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.