मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यावर तांत्रिक बिघाड; 30 मिनिटांच्या अंतराने मोनो सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 13:56 IST2019-12-19T13:56:12+5:302019-12-19T13:56:21+5:30
गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या काळात चेंबूर ते वडाळा दरम्यानच्या पहिल्या टप्प्यावर मोनोमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यावर तांत्रिक बिघाड; 30 मिनिटांच्या अंतराने मोनो सुरू
मुंबई : गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या काळात चेंबूर ते वडाळा दरम्यानच्या पहिल्या टप्प्यावर मोनोमध्ये तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक बिघाडामुळे या मार्गावर मोनो 30 मिनिटांच्या अंतराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना मोनो स्थानकांवरच ताटकळत उभे राहावे लागत आहे. वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्पावर मोनो नियोजित वेळेनुसार धावत आहेत. पहिल्या टप्प्यावरील मोनोची सेवा पूर्ववत करण्याचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्पष्ट केले आहे.