Join us  

बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच, या तारखेला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 8:22 PM

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या सिनेमाचा टीझर लॉंच करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अभिनेते अमिताभ बच्चन, संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थित टीझर लॉंच करण्यात आला. 

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या सिनेमाचा टीझर लॉंच करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अभिनेते अमिताभ बच्चन, संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थित टीझर लॉंच करण्यात आला. हा सिनेमा 23 जानेवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे.

बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित सिनेमात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार  आहे. यावेळी टीझर लॉंचिंगवेळी नवाजुद्दीन सिद्दीकी उपस्थित नव्हता. मात्र, त्याने व्हिडिओच्या माध्यमातून या चित्रपटाविषयी आणि बाळासाहेबांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. याचबरोबर, यावेळी संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेबांसोबत मी जास्त काळ घालवला होता. त्यांनी मी जास्त ओळखतो. ज्यांच्या आयुष्यात असे बरंच काही आहे, जे मोठ्या पडद्यावर दाखवले जाऊ शकते. ते जनतेचे नेते होते. मेनस्ट्रीममध्ये हा सिनेमा लोकप्रिय व्हावा, असे मला वाटते. तर हा सिनेमा फक्त माझ्या वडिलांवर नाही, तर ज्या व्यक्तीनं इतिहास घडवला त्या व्यक्तीवर आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य तीन तासांत सामावू शकत नाही, त्यासाठी खरंतर वेबसिरीज काढली पाहिजे, असे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सांगितले. तसेच पुढे ते म्हणाले, बाळासाहेब यांच्यासोबत माझे जवळचे संबंध होते. त्यांनी मला आपल्या कुटुंबाचा एक भाग बनवला होता. ज्यावेळी माझे लग्न झाले. त्यावेळी त्यांनी मला मातोश्रीवर पत्नीसह बोलवले असता.  जयाचे त्यांनी आणि मॉं साहेबांनी आपल्या सुनेप्रमाणे स्वागत केले होते. याचबरोबर, बाळासाहेबांच्या शेवट्या दिवसांत ज्यावेळी ते हॉस्पिटलमध्ये होते, त्यावेळी मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. तेव्हा ज्या रुममध्ये बाळासाहेबांना ठेवण्यात आले होते. त्या रुममधील भीतीवर माझा फोटो होतो. तो पाहून मी कृतज्ञ झालो. माझ्या मनात बाळासाहेबांबद्दल नेहमीच आदर राहील, अशा शब्दांत अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.   

कसलेला अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. नेहमीच आव्हानात्मक भूमिका स्वीकारणा-या नवाजुद्दीनसाठी ही भूमिकाही तितकीच आव्हानात्मक असणार आहे यात काही वाद नाही. हा एक चरित्रपट असणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत चित्रपटाची निर्मिती करणार असून, अभिजीत पानसे दिग्दर्शक असतील. संजय राऊत यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. त्यांना यासाठी चार वर्ष लागली.

नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारणार असल्याने आधीच उत्सुकता वाढली आहे. यापूर्वी मराठीत संजय राऊत यांनी 'बाळकडू' हा मराठी चित्रपट बनविला होता. मात्र, त्यात मराठी तरूणाला बाळासाहेबांपासून प्रेरणा कशी मिळते व त्याच्या चेतना जाग्या कशा होतात हे दाखविण्यात आले होते. बाळकडू हा चित्रपट बायोपिक गटात मोडणारा नव्हता. तसंच चित्रपटात फक्त बाळासाहेबांचा आवाज वापरण्यात आला होता. पण यावेळी हिंदी चित्रपटात नवाजुद्दीन त्यांची भूमिका साकारणार असल्याने प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.  

टॅग्स :सिनेमाबाळासाहेब ठाकरे