घाटकोपरमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 02:32 IST2018-03-25T02:32:10+5:302018-03-25T02:32:10+5:30

अकाउंट्समध्ये गुण वाढवून देण्याच्या नावाखाली ४० वर्षीय शिक्षकाने, वर्गातच विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी शिक्षक इम्रान खानला अटक करण्यात आली आहे.

Teacher's molestation by a teacher in Ghatkopar | घाटकोपरमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

घाटकोपरमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

मुंबई : अकाउंट्समध्ये गुण वाढवून देण्याच्या नावाखाली ४० वर्षीय शिक्षकाने, वर्गातच विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी शिक्षक इम्रान खानला अटक करण्यात आली आहे.
घाटकोपर पूर्वेत १७ वर्षांची विद्यार्थिनी कुटुंबासह राहते. ती जवळच्याच महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून अकरावीचे शिक्षण घेत आहे. त्याच महाविद्यालयात खान हा अकाउंट विषय शिकवितो. ८ मार्चला शेवटचा पेपर होता. त्याच दरम्यान खानने तिला वर्गात बोलावून घेतले. अकाउंट विषयात कमी गुण पडल्याचे सांगितले. वाढीव गुणासाठी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. कुणाकडे वाच्यता केल्यास नापास करण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने रडतच घर गाठले. त्यानंतर, ती सतत तणावाखाली घरातच बसून राहायची.
शनिवारी आईने तिला विश्वासात घेत विचारले असता, तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पंतनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी खानला शनिवारी रात्री अटक केली. या घटनेमुळे विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Teacher's molestation by a teacher in Ghatkopar

टॅग्स :Crimeगुन्हा