शिक्षकांना पगार नाही

By Admin | Updated: May 19, 2014 05:16 IST2014-05-19T05:16:19+5:302014-05-19T05:16:19+5:30

आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून पगारापासून ‘आॅनलाइन’ प्रक्रियेमुळे वंचित राहिले आहेत.

Teachers do not have a salary | शिक्षकांना पगार नाही

शिक्षकांना पगार नाही

शशिकांत ठाकूर, कासा - आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून पगारापासून ‘आॅनलाइन’ प्रक्रियेमुळे वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांच्या आधी प्रश्न मार्गी न लागल्यास महाराष्टÑ राज्य अनुदानित आश्रमशाळा संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाचा आदिवासी विकास विभाग विविध राबविल्या जाणार्‍या योजनांवर करोडो रुपये दरवर्षी खर्च करते, मात्र आदिवासी दुर्गम डोंगराळ भागातील आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या शिक्षकांना तीन महिन्यापासून पगारच नाही. आॅनलाइन प्रक्रियेद्वारे शिक्षकांचा गेल्या पाच महिन्यापूर्वीपासून पगार केला जातो, मात्र आॅनलाइन प्रक्रियेत तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण पुढे करत आदिवासी प्रकल्पांतर्गत अनुदानित आश्रमशाळेतील फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असा तीन महिन्यांचा पगार झालेला नाही. दरम्यान, लग्नसराई, मुलांचे प्रवेश व उन्हाळी सुट्ट्या असल्याने पगारच न झाल्याने हे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही कर्मचार्‍यांनी पगार नसल्याने उन्हाळी सुट्टीत गावाकडे जाणे टाळले आहे, तर काही कर्मचार्‍यांनी बँक, पतपेढीतून कर्ज काढून मुलांचे, शाळांचे प्रवेश, लग्नसराईची खरेदी केली आहे, मात्र आधीच घरासाठी व इतर कामासाठी कर्ज घेतल्याने बँक व पतपेढीतूनही कर्ज न मिळाल्याने अशा कर्मचार्‍यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही अशक्य झाले आहे. एकंदरीत तीन महिन्यांपासून पगार थांबल्याने या संदर्भात कर्मचारी व संघटना वारंवार प्रकल्प अधिकारी व अप्पर आयुक्तांना भेटून आपली गाºहाणी मांडत आहेत. तरीही सदर प्रश्न न सुटल्याने कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Teachers do not have a salary