४ देशांना टाटा रुग्णालय देणार कॅन्सरवरील उपचाराबाबत प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 07:01 IST2025-07-08T07:01:03+5:302025-07-08T07:01:22+5:30
हा कार्यक्रम भारत सरकारच्या अणु ऊर्जा विभागाचे सचिव आणि अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए. के. मोहंती यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

४ देशांना टाटा रुग्णालय देणार कॅन्सरवरील उपचाराबाबत प्रशिक्षण
मुंबई : बांगलादेश, भूतान, म्यानमार आणि नेपाळ या देशांची बिम्सटेकचे सदस्य राष्ट्र म्हणून ओळख असून या देशामधील डॉक्टरांना टाटा रुग्णालयातर्फे कॅन्सरच्या उपचारवरील अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ व्या बिम्सटेक शिखर परिषदेच्या वेळी केलेल्या घोषणेनुमार, ‘बिम्सटेक देशांसाठी कॅन्सर केअरमधील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम’ सोमवारी मुंबईतील टाटा स्मारक केंद्र येथे भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सुरु करण्यात आला.
हा कार्यक्रम भारत सरकारच्या अणु ऊर्जा विभागाचे सचिव आणि अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए. के. मोहंती यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी परराष्ट्र मंत्रालयातील बिम्सटेक व सार्क विभागाचे महसचिव थी सी. एम. आर. राम, टाटा स्मारक केंद्राचे संचालक डॉ. मुदीप गुप्ता आणि विशाखापट्टणम येथील होमी भाभा कॅन्सर रुग्णालय व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. उमेश महंतशेट्टी हे देखील उपस्थित होते. परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव (बिम्सटेक व सार्क ) डॉ. मी. एस. आर. राम यांनी सांगितले की, या प्रशिक्षण उपक्रमामध्ये बांगलादेश, भूतान, म्यानमार आणि नेपाळ या बिम्सटेक देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या देशामध्ये वाढणान्या कॅन्सर रुग्णसंख्येमुळे आणि गुणवत्तापूर्ण ऑन्कोलॉजी सेवांमध्ये असलेल्या असमानतेमुळे कौशल्य विकास आणि क्षमता निर्मितीच्या दृष्टीने एकत्रित प्रयवांची गरज निर्माण झाली आहे. हा उपक्रम केवळ कॅन्सर उपचार सुधारण्यापुरता मर्यादित नसून, बिम्सटेक देशांमध्ये भविष्यातील सहकार्य आणि संशोधनामाठी नेटवर्क तयार करण्यासही सहाय्यक ठरेल.