Join us  

नाना पाटेकरांविरोधात तनुश्री दत्ताकडून ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 10:52 PM

 'हॉर्न ऑके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकरांनी गैरवर्तन केल्याचा आरोप

मुंबई: अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर जाहीरपणे गंभीर आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्तानं याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तनुश्रीनं ओशिवरा पोलीस ठाण्यात नाना पाटेकर आणि कोरियोग्राफर गणेश आचार्य यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. 2008 मध्ये 'हॉर्न ऑके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीनं केला होता. मी टू कॅम्पेनवर बोलताना तनुश्री दत्तानं 2008 मध्ये 'हॉर्न ऑके प्लीज'च्या सेटवर घटनेचा संदर्भ देत नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. चित्रपटाच्या सेटवर गाण्याचं शूटिंग सुरू असताना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केलं होतं, असा आरोप तनुश्रीनं केला होता. तनुश्रीच्या आरोपांनंतर नाना पाटेकर यांच्या वकीलांमार्फत तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. मात्र नानाकडून अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा तनुश्रीनं केला आहे. उलट आपल्याला धमक्या मिळत असल्याचा आरोप करत आपल्याकडेही वकिलांची टीम सज्ज असल्याचं तनुश्रीनं म्हटलं आहे. तनुश्रीच्या आरोपांवर नाना येत्या ८ ऑक्टोबर रोजी नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्दीकी ही कलाकार मंडळी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेमध्ये ते तनुश्रीने केलेल्या आरोपांना उत्तर देणार आहेत. दरम्यान, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नाना पहिल्यांदाच या आरोपांविषयी जाहीरपणे आपली बाजू मांडणार आहेत. 

टॅग्स :तनुश्री दत्तानाना पाटेकरबॉलिवूड