Join us
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीचा फायदा घेत महिलेला अश्लील स्पर्श, कांदिवलीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 02:56 IST

कांदिवली (प.) रेल्वे स्थानक परिसरात रविवारी रात्री एका विकृताने गर्दीचा फायदा घेत महिलेला अश्लील स्पर्श केला.

मुंबई : कांदिवली (प.) रेल्वे स्थानक परिसरात रविवारी रात्री एका विकृताने गर्दीचा फायदा घेत महिलेला अश्लील स्पर्श केला. याचा जाब विचारताच त्याने पीडित महिलेला शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे स्थानिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.तक्रारदार महिला पतीसोबत रेल्वे स्थानकातून आपल्या घरी निघाली होती. त्यावेळी एक जण तिला अश्लीलपणे स्पर्श करून पुढे गेला. महिलेने त्याला थांबवून याबाबत जाब विचारताच, त्याने तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे महिलेच्या पतीने त्याला पकडून चोपण्यास सुरुवात केली. येथे जमलेल्या लोकांना जेव्हा हा प्रकार समजला, तेव्हा त्यांनीदेखील त्याला चोप दिला.याबाबत कांदिवली पोलिसांना समजताच, त्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी लवकरच दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कांदिवली पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :महिलामुंबईगुन्हेगारी