तुमच्या घोषणाबाजीचा एकदा तरी आढावा घ्या- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 05:20 IST2018-08-08T05:20:12+5:302018-08-08T05:20:45+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी महाअधिवेशनाच्या व्यासपीठावरून काही घोषणा केल्या.

Take a quick look at your shouting - Ashok Chavan | तुमच्या घोषणाबाजीचा एकदा तरी आढावा घ्या- अशोक चव्हाण

तुमच्या घोषणाबाजीचा एकदा तरी आढावा घ्या- अशोक चव्हाण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी महाअधिवेशनाच्या व्यासपीठावरून काही घोषणा केल्या. मुख्यमंत्री अशा अनेक घोषणा करीत असतात. परंतु आपल्याच घोषणांची आपण अंमलबजावणी करतो का? याचा वर्षातून एकदा तरी मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
फडणवीस यांनी ओबीसींच्या नोकरीतील अनुषेश भरून काढण्यासोबतच विविध घोषणा केल्या होता. याचा संदर्भ देत चव्हाण म्हणाले, महाअधिवेशनाच्या आयोजकांनाही माझी विनंती आहे की, आज या व्यासपीठावरून ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी झाली की नाही याचा आढावा त्यांनी पुढच्या अधिवेशनात घ्यावा. समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. सरकारने या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावू नयेत, असेही चव्हाण म्हणाले.
राज्य, राष्ट्रीय पातळीवर सामाजिक संघर्ष निर्माण होतो की काय अशी चिंता अनेकांना वाटते. आरक्षणामुळे अनेक जण आमदार, खासदार, मंत्री झाले; पण समाज आहे तिथेच आहे, अशी खंतही चव्हाण यांनी व्यक्त केली.

Web Title: Take a quick look at your shouting - Ashok Chavan