Ladki Bahin Yojana: ‘त्या’ लाडक्या बहिणींच्या मदतीला येणार ‘ताई’; e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:40 IST2025-12-11T12:39:41+5:302025-12-11T12:40:37+5:30
Ladki Bahin Yojana e-KYC: विशेषतः पती, वडील व मुलाच्या आधार क्रमांकावर मोबाइल नोंदणीकृत असल्याने ओटीपी उपलब्ध न होणाऱ्या अनेक महिलांचे ई-केवायसी रखडले.

Ladki Bahin Yojana: ‘त्या’ लाडक्या बहिणींच्या मदतीला येणार ‘ताई’; e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करताना ओटीपी मिळण्यात अडचणी येत होत्या.
म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी
विशेषतः पती, वडील व मुलाच्या आधार क्रमांकावर मोबाइल नोंदणीकृत असल्याने ओटीपी उपलब्ध न होणाऱ्या अनेक महिलांचे ई-केवायसी रखडले. यासाठी सरकारने ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवली असून, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आता प्रत्यक्ष कागदपत्रांच्या आधारे ई-केवायसी पूर्ण करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ई-केवायसीला मुदतवाढ
लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. ओटीपी न मिळाल्याने अडचणीत सापडलेल्या महिलांना याचा थेट फायदा होणार आहे.
मुंबईतील सुमारे ३० हजार लाभार्थी महिलांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. यात शहरातील १२,४५८ तर उपनगरातील १८,९७२ महिलांचा समावेश आहे.
अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्रे द्या
मुंबई शहरात ९२६ व उपनगरात ४,२२१ अशा एकूण ५,१४७ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिलांना कागदपत्रांच्या आधारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
स्वतंत्र सर्वेक्षणही सुरू
अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थी महिलांचा स्वतंत्र सर्वेक्षण मोहिमेद्वारे आढावा घेतला जात आहे. यामुळे अपात्र लाभार्थींवरही कारवाई होणार आहे.
विधवा, घटस्फोटित महिलांना दिलासा
पती, वडील किंवा मुलाच्या आधारवरील मोबाइल उपलब्ध नसलेल्या विधवा, घटस्फोटित व एकल महिलांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.
उत्पन्न तपासणीसाठी वडील-पतीचे आधार
लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासण्यासाठी तिच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. यामुळे महिलेच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची खात्री केली जाणार आहे.