Video : बच्चू कडूंकडून फडणवीसांच्या 'गोड' आठवणी, महाविकास आघाडीलाही चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 09:46 AM2019-12-02T09:46:59+5:302019-12-02T09:48:27+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं उदाहरण देऊन कडू यांनी कौतुक केलं.

'Sweet' memories of Devendra Fadnavis from bachhu kadu, even tweaked to maha vikas aghadi | Video : बच्चू कडूंकडून फडणवीसांच्या 'गोड' आठवणी, महाविकास आघाडीलाही चिमटा

Video : बच्चू कडूंकडून फडणवीसांच्या 'गोड' आठवणी, महाविकास आघाडीलाही चिमटा

Next

मुंबई - उद्धव ठाकरे सरकारनं विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्तुतिसुमनं उधळली. उद्धव ठाकरे हे राजकारणातले हरिश्चंद्र माणूस असल्याचं बच्चू कडू म्हटले होते. तर, विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन केले. यावेळी, फडणवीस यांच्या नेतृत्वाचं गोड कौतुकही बच्चू कडूंनी केलं. कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यावरुनही सर्वच राजकीय नेत्यांना टोला लगावला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं उदाहरण देऊन कडू यांनी कौतुक केलं. दादारावजी घोडेस्वार एक वीरचक्र म्हणून सैनिक मरण पावला, त्यावेळी तिरंग्यात या सैनिकाला अंत्यसंस्कारासाठी नेण्यात यावं, अशी स्थानिकांची आग्रही मागणी होती. त्यावळेी, मी एक मेसेज मुख्यमंत्री फडणवीस यांना केला, तेव्हा एका मेसेजवर त्यांनी ही मागणी मान्य करत शहीद दादाराव यांचा तिरंग्यात सन्मान केला. मुख्यमंत्री म्हणून आरोग्याचा सहावा मजलाही आपण जो चालवला तो, अतिशय मजबूत आणि चांगला चालवला, असे दोन किस्से सांगत बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावरील कामाचे कौतुक केले. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येतील, असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण, राजकारणात केवळ सत्ता हीच महत्त्वाची असते, हे समजलं. राजकारणात तुमच आमचं वर्तन पाहून, वरच्याला पाहून खालंच सगळं घडतंय. आता मला भिती वाटतेय, खाली ग्रामपंचायतीमध्ये का होईल?. जिल्हा परिषदमध्ये काय होईल? पहिल्या दिवशी दुसरा सरपंच आणि तिसऱ्या दिवशी दुसरा सरपंच अशा भानगडी खाली होणार आहेत. आता, खाली सगळ्या अडचणी आहेत, असे म्हणत राज्यातील महाविकास आघाडीवरही कडू यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली. दरम्यान, बच्चू कडूंनी देवेंद्र फडणवीस यांच्या चांगल्या आठवणी सांगत, त्यांचं अभिनंदन केलं. डोक्यात कायम राजकारण करू नये, असे म्हणत सर्वच राजकीय नेत्यांनाही कडू यांनी टार्गेट केलं.   
 

Web Title: 'Sweet' memories of Devendra Fadnavis from bachhu kadu, even tweaked to maha vikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.