Join us

स्वरा भास्करच्या 'त्या' सीनने इंटरनेट 'खवळीलं'; वीरे दी वेडिंग नेटिझन्सच्या हिटलिस्टवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 18:20 IST

मुलीच्या जातीला हे शोभतं का?, हा प्रश्न आपल्याकडे पूर्वापार चालत आला आहे. त्यावर भाष्य करणारा वीरे दी वेडिंग हा सिनेमा इंटरनेटवर 'हॉट टॉपिक' ठरलाय.

मुंबईः आजच्या जमान्यातील चार देधडक मुलींची बेधडक गोष्ट, म्हणून अनेक दिवस चर्चेत असलेल्या 'वीरे दी वेडिंग' या सिनेमातील एका दृश्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हस्तमैथुन करत असल्याचा सीन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. हे दृश्य काही तरुण-तरुणींच्याही पचनी पडत नसून, त्यावरून तिला अत्यंत वाईट्ट पद्धतीनं ट्रोल केलं जातंय. हे ट्रोलिंग स्वरानं फारसं मनावर घेतलं नसल्याचं तिच्या मिष्किल प्रतिक्रियेतून जाणवतं. मुलीच्या जातीला हे शोभतं का?, हा प्रश्न आपल्याकडे पूर्वापार चालत आला आहे. आज २१व्या शतकात, स्त्री-पुरुष समानतेच्या काळातही, काही गोष्टी महिलांनी करणं गैर मानलं जातं. हळूहळू त्या विरोधात सूर उमटू लागले आहेत. शिष्टाचाराचे सगळे नियम महिलांनाच का?, सगळी बंधनं महिलांवरच का?, असे प्रश्न विचारत काही संघटना महिला हक्कांसाठी पुढे सरसावत आहेत. आजच्या काळातील तरुणींना तर अनेक जुने विचार, कल्पना बुरसटलेल्या वाटतात. 'वीरे दी वेडिंग' ही अशाच तरुणींची गोष्ट आहे. हा सिनेमा १ जून रोजी प्रदर्शित झालाय आणि 'हिट'ही ठरलाय. पण त्यासोबतच, स्वरा भास्करच्या हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे तो संस्कारी सिनेप्रेमींच्या हिटलिस्टवर गेला आहे. 

स्वरावर कशा पद्धतीने हल्लाबोल सुरू आहे, हे खालील ट्विटवरून लक्षात येईल. काही ट्विट अगदीच हीन पातळीवरची आहेत, पण काही मतं विचार करायला लावणारीही आहेत. 

अर्थात, स्वराचे चाहते तिच्या बाजूने उभे राहिल्याचंही पाहायला मिळतंय. त्यामुळे स्वरा हे ट्रोलिंग एन्जॉय करताना दिसतेय.

टॅग्स :बॉलिवूडकरमणूकमहिला