पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तीन डॉक्टरांसह युनिट हेड निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 06:25 IST2019-05-28T06:25:48+5:302019-05-28T06:25:56+5:30
नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या रॅगिंगच्या जाचाला कंटाळून पायल तडवी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे.

पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तीन डॉक्टरांसह युनिट हेड निलंबित
मुंबई : नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या रॅगिंगच्या जाचाला कंटाळून पायल तडवी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी सोमवारी प्रसूती विभागातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना निलंबित करण्यात आले. रुग्णालयाचे अधिष्ठाता रमेश भारमल यांच्या सहीने हे निलंबनाचे आदेश काढण्यात आले. तर स्त्री रोग तज्ज्ञ विभागाच्या युनिट हेड चिंग लिंग यी यांना वैद्यकीय विभागाचे उपायुक्त सुनील धामणे यांच्या सहीने निलंबित केल्याची माहिती अधिष्ठाता भारमल यांनी दिली.