Join us  

Sushant Singh Rajput Suicide: आत्महत्येपूर्वी सुशांत सिंग राजपूतने केला होता मित्राला अखेरचा कॉल, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 10:39 PM

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांना सुशांतच्या रुममध्ये कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही.

ठळक मुद्देगेल्या काही महिन्यापासून सुशांत राजपूत डिप्रेशनमध्ये असल्याची माहितीसुशांत कोणत्या गोष्टींवरून इतका चिंतेत होता म्हणून आत्महत्येचं पाऊल उचललं याचा शोधपोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सोमवारी क्राईम ब्रांचची टीमही सुशांतच्या घरी जाणार

मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अचानक जाण्यानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सुशांतने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप काहीच माहिती मिळाली नाही, गेल्या काही महिन्यापासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता पण तो कोणत्या गोष्टींवर चिंतेत होता याची माहिती नाही. पोलिसांनी प्रथमदर्शनी सुशांतने गळफास लावून आत्महत्या केली आहे असा निष्कर्ष काढला आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांना सुशांतच्या रुममध्ये कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. मात्र सुशांतने आत्महत्येपूर्वी एका मित्राला कॉल लावला होता पण त्याने तो उचलला नाही अशी माहिती टाइम्स नाऊने पोलिसांच्या हवाल्याने दिली आहे. मात्र हा कॉल सुशांतने कोणत्या मित्राला लावला होता याबाबत पोलिसांनी सांगण्यास नकार दिला आहे.

सुशांतच्या डिप्रेशनची कारण काय याबाबत अनेक चर्चा होत आहेत, यामध्ये प्रामुख्याने सुशांतच्या ब्रेकअपबद्दलही बोललं जात आहे. सुशांत सिंग राजपूत यांचे अंकिता लोखंडे हिच्याशी जवळपास सहा वर्षे संबंध होते, त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. या ब्रेकअपनंतर सुशांतने म्हटले होते की अंकिताशी नातं आणि ब्रेकअप याबाबत जाणून घेण्यासाठी आता काही बाकी नाही. माझं नातं अथवा ब्रेकअपमागे माझं वैयक्तिक आहे जे मी अधिकृत सांगू शकत नाही. अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअपनंतर तो दुखावला होता. अंकिता आणि सुशांत यांचे नाते पवित्रा रिश्ता या सिरियलच्या सेटवर झालं होतं, त्यानंतर २०१६ मध्ये या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

यानंतर बॉलिवूडमध्ये काही काळ अशी चर्चा रंगली होती की सुशांत सिंग राजपूतचे रिया चक्रवर्तीसोबत प्रेमसंबंध आहे. तथापि, या दोघांनी यावर कधीच भाष्य केलं नाही. यावर्षी ११ मार्च रोजी सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती एकत्र दिसले होते.

दरम्यान, सुशांतवर मानसिक आजाराचे उपचार सुरु होते, त्याचे औषधही तो घेत होता. सुशांतने आपल्या आयुष्यातील शेवटचे ३ तास तणावात घालवले. आज सकाळी साडेसहा वाजता त्याला जाग आली तेव्हा कोणीही असा विचार केला नसेल की, आजची सकाळ त्याची अखेरची असेल. सुशांतने ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी घरात सुशांतसह काही अन्य लोकही उपस्थित होते, सुशांतसह त्याच्या घरी जेवण बनवणारा, क्रिएटिव्ह मॅनेजर आणि अन्य एक सदस्य हजर होता. तो सकाळी ठीक होता असं त्याच्या मित्राने सांगितले.

रिपोर्टनुसार सकाळी साडेसहा वाजता सुशांत झोपेतून उठला, घरातील नोकराने साडे नऊच्या सुमारास त्याला अननसाचा ज्यूस रुममध्ये जाऊन दिला. त्यानंतर सुशांत आपल्या बहिणीशी बोलत होता, त्यानंतर तो बेडरुममध्ये गेला आणि आतून दार बंद करुन घेतले. जेवणासाठी नोकराने त्याचा दरवाजा ठोठावला, पण तो बाहेर आला नाही, मॅनेजरने सुशांतच्या बहिणीला कॉल लावला. बहीण आल्यानंतर चावीवाल्याला बोलावून दार उघडण्यात आले, पण रुममध्ये समोरचा नजारा पाहून सर्वांनाच धक्का बसला.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सुशांत सिंग राजपूतबाबत नवा खुलासा; चुलत भावाने केला ‘हा’ दावा

सुशांत राजपूतच्या आयुष्यातील शेवटचे ३ तास कसे होते? सकाळी सर्वकाही ठीक होतं पण...

 ‘हा’ फोटो निव्वळ योगायोग की आत्महत्येचे संकेत; सुशांत राजपूतच्या ट्विटरवरील पेंटींग कोणाची?

‘ती’ बंगाली मुलगी कोण? सुशांत राजपूतच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा, कुटुंबाची मागणी

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतआत्महत्यापोलिस