Sushant Singh Rajput Suicide rs 2 63 crore allegedly transferred to ca account from actor sister | Sushant Singh Rajput Suicide: सुशांतचे २.६३ कोटी 'त्या' दोन व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये?; ईडीकडून शहानिशा सुरू

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतचे २.६३ कोटी 'त्या' दोन व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये?; ईडीकडून शहानिशा सुरू

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दोन सनदी लेखापालांंच्या (सीए) बँक खात्यात गेल्या वर्षभरात दोन कोटी ६३ लाख रुपये जमा करण्यात आले. सुशांतच्या बहिणीच्या नावे फिक्स्ड डिपॉझिट असलेली रक्कम मोडून ही रक्कम तिकडे हस्तांतरित केल्याचा दावा सुशांतच्या कुटुंबीयांनी केल्याचे समजते. ईडीकडून याची शहानिशा करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुशांतच्या कुटुंबाच्या हवाल्याने केलेल्या दाव्यानुसार, सुशांतच्या दोन सीएच्या खात्यांवर मे २०१९ ते एप्रिल २०२० या कालावधीत तब्बल २ कोटी ६३ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले. सुशांतच्या बहिणीच्या नावे कायमस्वरूपी ठेव म्हणून साडेचार कोटी ठेवले होते. मात्र रियाच्या सांगण्यावरून ही रक्कम मोडल्याचा त्याच्या कुटुंबाचा दावा आहे. याबाबत सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) संबधिताचे बँकेचे व्यवहार तपासून शहानिशा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ईडीने मनी लॉन्ड्रींगअंतर्गत सुशांतची मैत्रीण व अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

शोविकची साडे अठरा तास चौकशी
रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीकडे शनिवारी ईडीने साडेअठरा तास चौकशी केली. शनिवारी दुपारी तो कार्यालयात गेला होता. त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास बाहेर पडला. त्याचे सुशांतशी असलेले संबंध, व्यावसायिक भागीदारी, त्याचा त्यातील हिस्सा याबाबत सखोल माहिती घेण्यात आली. सोमवारी सिद्धार्थ पिटानी व इतरांकडे ईडी चौकशी करेल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant Singh Rajput Suicide rs 2 63 crore allegedly transferred to ca account from actor sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.