Sushant Singh Rajput Death Case: सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाने साधला सेलिब्रिटींशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:53 IST2020-08-15T03:25:35+5:302020-08-15T06:53:26+5:30
पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली

Sushant Singh Rajput Death Case: सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाने साधला सेलिब्रिटींशी संवाद
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू असून या चौकशीत सुशांतच्या मृत्यूपूर्वी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीने अनेक सेलिब्रिटींशी संवाद साधल्याचे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुशांतच्या मृत्यूपूर्वी १३ जून रोजी रियाने कास्टिंग डायरेक्टर निशा चटालिया हिला ७.५० मिनिटांनी फोन केला होता. त्यानंतर दिग्दर्शक-निर्माते इंद्रजीत नातोजी यांना फोन केला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास रूपा चड्ढा नावाच्या महिलेसोबत ७ मिनिटे ८ सेकंदांपर्यंत तिचे बोलणे झाले होते. यानंतर ९ वाजून ४३ मिनिटांनी एयू नावाच्या व्यक्तीला तिने कॉल केला. या व्यक्तीशी तिने १ मिनिट ३८ सेकंद गप्पा मारल्याची माहिती तिच्या कॉल रेकॉर्डमधून समोर आली आहे. त्यानुसार पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अंकितासाठी खरेदी केला कोट्यवधीचा फ्लॅट
ईडीच्या तपासात सुशांतने त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला मालाडमध्ये साडेचार कोटींचा फ्लॅट खरेदी करून दिल्याची माहिती समोर आली आहे. याचे ईएमआयही सुशांतच भरत होता.
सध्या अंकिता याच फ्लॅटमध्ये राहते. हा फ्लॅट सुशांतच्याच नावावर आहे. रियाने केलेल्या दाव्यानुसार सुशांतला हा फ्लॅट खाली करायचा होता. मात्र अंकिता हा फ्लॅट सोडण्यास तयार नव्हती. ईडी याबाबत अधिक तपास करत आहे.