Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीने ‘एयू’ला केले ६३ वेळा कॉल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 06:53 IST2020-08-14T03:56:46+5:302020-08-14T06:53:05+5:30
ईडीकडून मोबाइलमधील माहितीची पडताळणी; अनेक बड्या सेलिब्रिटींशी संभाषण

Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीने ‘एयू’ला केले ६३ वेळा कॉल!
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आर्थिक व्यवहाराच्या अनियमिततेबाबत सक्तवसुली संचालनालय (ईडी) करीत असलेल्या चौकशीतून अनेक बाबी समोर येत आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीने तिच्या मोबाइलवरून ‘एयू’ नावाच्या व्यक्तीशी काही दिवसांच्या कालावधीत तब्बल ६३ वेळा कॉल केल्याची माहिती आहे. तर, अनन्या उधास असे तिचे नाव असल्याची माहिती रियाने दिली.
ईडीने मनी लॉड्रिंंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर रियासह सहा जणांकडे चौकशी सुरू आहे. त्यामध्ये ती सहकार्य करीत नसल्याने अधिकाऱ्यांनी तिचे दोन मोबाइल, लॅपटॉप तसेच तिचा भाऊ शोविक व वडील इंद्रजीत यांचे मोबाइल जप्त केले. त्यातील डाटा व कॉल रेकॉर्डिंग तपासण्यात येत असून रियाने सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर अनेकांशी संपर्क साधल्याचे तपासातून पुढे आले आहे. तिच्या मोबाइलमध्ये ‘एयू’ नावाने एक नंबर सेव्ह आहे. त्यावर रियाने ६३ वेळा कॉल केला. त्याबाबत विचारले असता अन्यया उधास नावाचा शॉर्टफॉर्म आहे, ती फॅमिली फ्रेंड असल्याचे तिने अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र रियाने तिला इतक्या वेळा कोणत्या कारणासाठी कॉल केला, याबाबत रियाने सविस्तर माहिती देण्याचे टाळले. त्यामुळे अधिकारी त्याबाबत संशय व्यक्त करीत आहेत. आवश्यकता वाटल्यास तिच्याकडे चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
आमीर खान, महेश भट्टसह रियाचा अनेकांना कॉल
रियाच्या कॉल डिटेल्सनुसार, रियायने आमीर खानला एकदा फोन केला होता. आदित्य रॉय कपूरला १६ वेळा, श्रद्धा कपूरला तीनदा, सनी सिंगला सात वेळा, तर राणा डग्गुबातीलीहा सातवेळा फोन केला होता. ती महेश भट्ट यांच्या सतत संपर्कात होती. रियाने त्यांना नऊ वेळा फोन केला होता. तिने कॉल केलेल्या अनेकांनीही तिला पुन्हा फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.