Join us

Sushant Singh Rajput: सलमान खान, करण जोहरनंतर अभिनेत्री अर्शी खान टार्गेटवर; पाहा काय म्हणाले नेटीझन्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 15:32 IST

आता सुशांतच्या मृत्यूनंतर मला वारंवार फोन आणि मेसेज यायला लागले आहेत, माझा पर्सनल नंबर त्यांना कुठून मिळाला याचीही मला कल्पना नाही असं अर्शी खानने सांगितले.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांकडून अनेक कलाकारांना ट्रोलिंग करण्यात येत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील गटबाजी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे सलमान खान, करण जौहर, आलिया भट्ट यासारखे अनेक स्टार किड्स हे नेटीझन्सच्या टार्गेटवर आहेत. अलीकडेच अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर यासंदर्भात काही स्क्रीन शॉट्स शेअर केले होते.

सोनम कपूरनंतर आता बिग बॉस फेम अर्शी खान हीदेखील चाहत्यांच्या टार्गेटवर आली आहे. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना अर्शी खान म्हणाली की, सोशल मीडियात तिच्याविरोधात अनेक मॅसेज येत आहेत. सर्वाधिक मेसेज तिला सलमान खानपासून दूर राहण्याबाबत सल्ले देण्यात येत असल्याचं ती म्हणाली. यासह तिला अनेकदा  स्लॅट शेजचा सामना करावा लागत आहे. केवळ सोशल मीडियावरच नाही तर काही नंबरवरून फोन कॉलही येत आहेत ज्यामध्ये ते तिला शिवीगाळ करण्यात येत आहे असा आरोप तिने लावला आहे.

तसेच सर्वांना माहिती आहे की, मी सलमान खानची खूप मोठी फॅन आहे. मी नेहमीच त्याबद्दल जाहीरपणे बोलत आली आहे. आजच नाही तर बिग बॉसच्या वेळेपासून त्याबद्दल मी सांगत आहे. आता सुशांतच्या मृत्यूनंतर मला वारंवार फोन आणि मेसेज यायला लागले आहेत, माझा पर्सनल नंबर त्यांना कुठून मिळाला याचीही मला कल्पना नाही असं अर्शी खानने सांगितले.

दरम्यान, सोशल मीडियात मला अनेकांचे मेसेज आलेत की, मी सलमान खानला अनफॉलो करु, सलमान खान आणि माझ्या नात्याबाबतही ते अतिशय अश्लिल शब्दात कमेंट करत आहेत. मी हे सर्वांच्या समोर सांगू शकत नाही पण माझ्यासाठी हे खूप दु:खदायक आहे. या प्रकरणात माझा समावेश कसा झाला हे माहिती नाही. पण मी गप्पपणे सगळं सहन करणार नाही, निश्चितच या लोकांच्या विरोधात मी कायदेशीवर कारवाई करणार आहे असा इशारा अर्शी खानने दिला आहे. १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधून अनेकांनी शोक व्यक्त केला, सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर अर्शी खाननेही त्याला श्रद्धांजली दिली होती.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसलमान खानबिग बॉस