सुशांतसिंह ड्रग्ज प्रकरण: क्षितिज प्रसादला न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 04:09 AM2020-10-04T04:09:42+5:302020-10-04T07:05:16+5:30

Sushant Singh Drugs case: प्रसादची शनिवारी एनसीबी कोठडी संपल्याने त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

Sushant Singh Drugs case Film Executive Kshitij Prasad Remanded To Judicial Custody In Drugs Case | सुशांतसिंह ड्रग्ज प्रकरण: क्षितिज प्रसादला न्यायालयीन कोठडी

सुशांतसिंह ड्रग्ज प्रकरण: क्षितिज प्रसादला न्यायालयीन कोठडी

Next

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने आठवडाभरापूर्वी अटक केलेल्या धर्मा प्रोडक्शनच्या माजी कार्यकारी निर्माता क्षितिज रवी प्रसाद याला शनिवारी विशेष एनडीपीएस न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

सुशांतसिंह राजपूत ड्रग्जप्रकरणी एनसीबी चौकशी करीत असून, त्या चौकशीत प्रसादचे नाव पुढे आले. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, प्रसादने आणखी एक आरोपी करमजीत आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून ड्रग्ज विकत घेतले. प्रसादची शनिवारी एनसीबी कोठडी संपल्याने त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

प्रसादचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयाला सांगितले की, एनसीबी प्रसादची छळवणूक करून ब्लॅकमेल करत आहेत. निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या नावाचा उल्लेख करण्यास जबरदस्ती करत आहेत. मात्र, एनसीबीने आरोप फेटाळून लावले.

रणबीर कपूर, अर्जुन रामपाल, डिनो मोरिया यांना गोवण्याचा एनसीबीचा प्रयत्न : क्षितिज प्रसा
एनसीबी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरिया यांना ड्रग्ज प्रकरणात गोवण्यासाठी आपल्याला जबरदस्ती करत आहे, असा क्षितिजचा आरोप आहे. क्षितिजने न्यायालयाला सांगितले की, या सर्वांची नावे स्वहस्ते लिहिण्यासाठी माझी छळवणूक करण्यात येत आहे. मला यातील काहीही माहीत नाही, असे मी तपास यंत्रणेला वारंवार सांगत आहे.

Web Title: Sushant Singh Drugs case Film Executive Kshitij Prasad Remanded To Judicial Custody In Drugs Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.