बिग बॉसच्या घरानंतर सुशांत शेलारला हवे म्हाडाचे घर, मुंबईतील लॉटरीसाठी केला अर्ज; उमेश जगतापही इच्छुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:27 IST2018-12-15T06:26:32+5:302018-12-15T06:27:54+5:30

बिग बॉसच्या मोठ्या घरात अनेक दिवस राहून आल्यानंतर अभिनेता सुशांत शेलार आता हक्काच्या घरासाठी म्हाडाच्या मुंबई लॉटरीत नशीब आजमावत आहे.

Sushant Shelar should own MHADA's house, Mumbai's lottery; Umesh Jagtap aspirant | बिग बॉसच्या घरानंतर सुशांत शेलारला हवे म्हाडाचे घर, मुंबईतील लॉटरीसाठी केला अर्ज; उमेश जगतापही इच्छुक

बिग बॉसच्या घरानंतर सुशांत शेलारला हवे म्हाडाचे घर, मुंबईतील लॉटरीसाठी केला अर्ज; उमेश जगतापही इच्छुक

मुंबई : बिग बॉसच्या मोठ्या घरात अनेक दिवस राहून आल्यानंतर अभिनेता सुशांत शेलार आता हक्काच्या घरासाठी म्हाडाच्या मुंबई लॉटरीत नशीब आजमावत आहे. सुशांतबरोबरच अभिनेता हृषीकेश जोशी, उमेश जगताप, अभिनेत्री नीलम शिर्के, गायिका मुग्धा वैशंपायन यांनी १६ तारखेला होणाऱ्या मुंबईतील म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरले आहेत. या सर्वांनी म्हाडाच्या कलाकार कोट्याच्या गटातून मुंबईतील विविध ठिकाणी हे अर्ज भरले असून यातील कोणाला घर लागेल, हे १६ डिसेंबरला लॉटरीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच समजेल.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १,३८४ घरांच्या या लॉटरीत अनेक कलाकार हक्काचे घर मिळावे म्हणून नशीब आजमावत आहेत. यात सध्या छोट्या पडद्यावर प्रसिद्ध असलेला अभिनेता उमेश जगताप याचे नाव सर्वांत वर आहे. त्याने मुंबई मंडळाच्या घराच्या लॉटरीसाठी तब्बल १० अर्ज भरले. अर्ज भरण्याची त्याची ही पहिलीच वेळ नाही. २००५ पासून तब्बल ४ वेळा त्याने म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला. मात्र घराची लॉटरी लागली नाही. त्यामुळे या वेळी त्याने नवी शक्कल लढविली आहे. म्हाडाने घरासाठी मुंबईत उपलब्ध करून दिलेल्या उच्च उत्पन्न गटातील घरासाठी ७ ठिकाणी आपल्या नावे तर, ३ ठिकाणी पत्नीच्या नावे असे १० अर्ज भरले आहेत.

उमेश जगतापबरोबरच अभिनेता सुशांत शेलारनेही सायनमधील हेरिटेज इमारतीतील घरासाठी अर्जाची नोंदणी केली. तर, अभिनेता हृषीकेश जोशीने पवईतील तुंगामधील घरासाठी अर्ज केला. अभिनेत्री नीलम शिर्के, गायिका मुग्धा वैशंपायन, दिग्दर्शक सुदेश मांजरेकर, अभिनेता नचिकेत देवस्थळी, संचित म्हात्रे, संहितालेखक तेजपाल यादव यांनीही कलाकार कोट्यातून घरासाठी अर्ज भरला आहे. मानखुर्दमधील पीएमजीपी वसाहत, मुलुंडमधील गव्हाणपाडा, गोरेगावात सिद्धार्थनगर, कांदिवलीत महावीरनगर येथे म्हाडाच्या घरांसाठी आणखी काही कलाकारांनीही अर्ज भरले.

Web Title: Sushant Shelar should own MHADA's house, Mumbai's lottery; Umesh Jagtap aspirant

टॅग्स :mhadaम्हाडा